शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: सरकारने फसवणूक केल्यास पुन्हा चक्काजाम करणार - श्रीरंग बरगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 15:50 IST

सदावर्तेंनी एसटी बँक बुडविली

कोल्हापूर : सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६५०० रुपयांची वेतनवाढ केली आहे. हा निर्णय चांगला आहे. बैठकीत या एकमेव मागणीबाबत चर्चा झाली आहे. महागाई भत्ता, वार्षिक वाढ, कर्मचाऱ्यांनी वार्षिक मोफत प्रवास पास यासंदर्भात ठोस निर्णय नाही. त्यासह वेतनवाढीच्या अंमलबजावणीत सरकारने फसवणूक केल्यास पुन्हा एसटी कर्मचारी राज्यभर चक्काजाम करतील, अशा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस श्रीरंग बरगे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.बरगे म्हणाले, राज्य सरकार आणि एसटी संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत वेतनवाढीचा निर्णय झाला. मात्र, त्याची अंमलबजावणीचे परिपत्रक तातडीने काढणे गरजेचे आहे. निर्णय होतो; पण परिपत्रकात त्रुटी राहत असल्याचा अनेक वर्षांचा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. गतवेळेसही अडीज, चार आणि पाच हजारांची वाढ झाली. मात्र, परिपत्रकात अनेक त्रुटी राहिल्या. सरकार एसटीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करत नाही. वेतनवाढीच्या बैठकीत अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना बोलाविणे अपेक्षित होते. मात्र, गुणरत्न सदावर्ते बेकायदेशीरपणे या बैठकीत आले.त्यांच्यामुळे कोणतीही वेतनवाढ आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. सदावर्ते कोणाच्या इशाऱ्यावर चालतात, हे सर्वांना माहिती आहे. या वेळी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँगेसचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर, सुनील घोरपडे, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

सदावर्तेंनी एसटी बँक बुडविलीकर्मचाऱ्यांनी स्टेट ट्रान्स्पोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेत ६०० हून अधिक कोटी रुपयांच्या ठेवी काढल्या. सदावर्तेंनी ही बँक बुडविली आहे. त्यांच्याच ९ संचालकांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. थोड्या दिवसात अन्य संचालकही त्यांना आणि त्यांच्या पॅनलला रामराम ठोकतील. कोट्यवधीच्या ठेवी काढल्याने एसटी कर्मचाऱ्यांना कर्ज मिळत नसल्याने आर्थिक कोंडी होत आहे. एसटीत संगणक प्रणालीसाठी कंत्राटदाराला २१ कोटी दिले आहेत. सदावर्तेवर कोणतीही कारवाई केली जात नाही. सदावर्तेला सरकार घाबरते की काय, असे स्थिती दिसते, असा आरोपही बरगे यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संप