शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘करवीर’मधील मतदारसंघ पुनर्रचनेचे त्रांगडे, हद्दवाढ झाल्यास कमी होतील दोन मतदारसंघ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:22 IST

इच्छुकांची घालमेल वाढली

प्रकाश पाटीलकोपार्डे : शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया निवडणूक विभागाने सुरू केली असली तरी हद्दवाढीमुळे त्रांगडे तयार झाले आहे. हद्दवाढीत उचगाव, पाचगाव, कळंबा, उजळाईवाडी या गावांसह पाडळी, बालिंगे येथील कॉलनींचा समावेश होण्याचे संकेत आहेत. ही गावे शहरात गेली तर जिल्हा परिषदेचे किमान दोन मतदारसंघ कमी होणार आहेत. त्यामुळे सगळ्याच मतदारसंघांची अदलाबदल करावी लागणार असल्याने इच्छुकांची घालमेल सुरू आहे.१२ जूनला निघालेल्या नोटिफिकेशनने करवीर तालुक्यात ११ ऐवजी १२ जिल्हा परिषद मतदारसंघ होणार आहेत. १२वा मतदारसंघ कोणता वाढणार याकडे निवडणूक लढवणाऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यानच्या काळात हद्दवाढीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हद्दवाढीत उचगाव, पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी या गावांसह पाडळी व बालिंगे या गावांचे गावठाण वगळून कॉलनी अशा आठ गावांचा शहरात समावेश केला जाणार आहेत.मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होण्याअगोदर ही हद्दवाढ झाली तर करवीरमधील दोन जिल्हा परिषद मतदारसंघ कमी होणार आहेत. नाही झाली तर एक मतदारसंघ वाढणार आहे. यामुळे जिल्हा परिषद मतदारसंघ वाढणार की कमी होणार याबाबत त्रांगडे निर्माण झाले आहे.जिल्ह्यात करवीर तालुका अडीच प्लॉटचा सर्वांत मोठा तालुका आहे. यात करवीर विधानसभा मतदारसंघ व दक्षिण विधानसभा मतदारसंघ येतात. करवीरमध्ये काँग्रेसला शिवसेनेचे, तर दक्षिणमध्ये भाजपचे तगडे आव्हान आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार नरके यांच्या विजयाने शिये, वडणगे, शिंगणापूर, सांगरूळ जिल्हा परिषद मतदासंघात ताकद वाढली आहे. उचगाव, पाचगाव, मुडशिंगी, उजळाईवाडीत आमदार अमल महाडिक यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाल्याने भाजपची ताकद वाढली आहे. वाशी, परितेमध्ये आजही काँग्रेसचे वर्चस्व आहे. करवीरमध्ये आपले वर्चस्व टिकवण्यासाठी काँग्रेसला जिवाचे रान करावे लागणार आहे.

मावळत्या जिल्हा परिषदेतील बलाबल

  • शिवसेना -२
  • काँग्रेस - ८
  • अपक्ष -१

करवीर पंचायत समिती

  • काँग्रेस- १६
  • शिवसेना- ४
  • भाजप -२

हद्दवाढीला गावांचा विरोध असल्याने ती शहरात घेण्याचा प्रश्नच येत नाही. याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे; पण निवडणूक आयोगाचेही याबाबत धोरण अजून जाहीर झालेले नाही. यामुळे करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ कमी होणार नाहीत. -आमदार चंद्रदीप नरके