शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा..; मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा

By पोपट केशव पवार | Updated: August 9, 2024 18:46 IST

'राजर्षी शाहू महाराज यांनी गोरगरीब मराठ्यांना दिलेले आरक्षण परत मिळवण्यासाठी मला साथ द्या'

कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारला सहा महिन्यांची मुदत दिली होती. त्यांनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही तर लोकसभेप्रमाणे येणाऱ्या विधानसभेलाही त्यांच्या जागा पाडणारच, असा थेट इशारा मराठा आरक्षणाचे लढाऊ नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दिला. राजर्षी शाहू महाराज यांनी गोरगरीब मराठ्यांना दिलेले आरक्षण परत मिळवण्यासाठी मला साथ द्या, अशी भावनिक सादही त्यांनी कोल्हापुरकरांना घातली.मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांची कोल्हापुरात आरक्षण जनजागृती व शांतता रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. मिरजकर तिकटी येथून सुरू झालेल्या रॅलीचे छत्रपती शिवाज महाराज चौकात आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. आपल्या १५ मिनिटांच्या भाषणात जरांगे-पाटील यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारवर तोफ डागताना महापूर, अलमट्टी, शेती या विषयांनाही स्पर्श करत कोल्हापुरकरांच्या भावनेला हात घातला.जरांगे-पाटील म्हणाले, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी झाली की आरक्षणाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. अन ती घेतल्याशिवाय मी थांबत नाही. सरकारला काय ताकद लावायची ती लावू द्या. वेळ आली की गोडीने, हात जोडून सांगतो, आरक्षण द्या. पण नाहीच ऐकले तर गोरगरिब मराठ्यांची पोरं मोठी करण्यासाठी यांना पाडावेच लागेल. शेवटचा पर्याय तेवढाच आहे. ती देणार नसाल तर पाडायच्या भूमिकेत यावे लागेल. मराठ्यांच्या आरक्षणाबरोबरच मुस्लिम व धनगर आरक्षणाचाही प्रश्नही मी हातात घेतला आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी त्याकाळी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण दिले होते. मात्र, काही जातीयवादी नेत्यांनी हे आरक्षण उडवून टाकले. शाहूंनी दिलेले आरक्षण परत मिळवायचे असेल तर मला साथ द्या, अशी भावनिक सादही जरांगे-पाटील यांनी कोल्हापूरकरांना घातली.पाडायचे की उभा करायचे यासाठी २९ ला अंतरवलीला यायेणाऱ्या विधानसभेला सकल मराठा समाजाच्या वतीने उमेदवार उभे करायचे की जे आरक्षण देणार नाहीत त्यांचे उमेदवार पाडायचे, याचा फैसला येत्या २९ ऑगस्टला अंतरवली सराटी येथील सभेत घेण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूरकरांनी या सभेला मोठ्या संख्येने यावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.पक्षासाठी नको, पोराबाळांसाठी लढासत्ताधाऱ्यांनी मला चारही बाजूंनी घेरले आहे. सर्वजण माझ्या पाठीमागे लागले आहेत. मात्र, तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, असा शब्द देत पक्ष, पक्षातील नेते मोठे करण्यापेक्षा स्वत:च्या पोराबाळांचे भविष्य पाहा, त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी तुम्ही लढा, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी समाजबांधवांना केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील