शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

डिसेंबरअखेर पुजारी हटावचा निर्णय न झाल्यास आंदोलन,कोल्हापूर संघर्ष समितीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 1:55 AM

कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी करण्यात येणाºया कायद्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीअंतर्गत येणाºया तीन हजार मंदिरांचा समावेश करून मूळ मुद्द्याला बगल

ठळक मुद्देपगारी पुजारी नेमण्याच्या मागणीवर ठामपुजाºयाने दिलेल्या धमकीबाबत कारवाई नाहीपुजाºयाने दिलेल्या धमकीबाबत कारवाई नाही

कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी करण्यात येणाºया कायद्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीअंतर्गत येणाºया तीन हजार मंदिरांचा समावेश करून मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रकार सुरू आहे; परंतु केवळ अंबाबाई मंदिरातच पगारी पुजारी नेमावा, या भूमिकेवर समिती ठाम असून, या अधिवेशनात डिसेंबरअखेर याबाबत निर्णय न झाल्यास जानेवारी महिन्यात रस्त्यावर उतरू, असा इशारा शनिवारी ‘अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समिती’तर्फे देण्यात आला.

शासकीय विश्रामगृह येथे सायंकाळी समितीची बैठक झाली. त्यावेळी हा इशारा देण्यात आला. बैठकीस समितीचे संजय पवार, आर. के. पोवार, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, सुरेश साळोखे, दिलीप पाटील, प्रा. जयंत पाटील, राजू लाटकर, बाबा पार्टे, शरद तांबट, आनंद माने, शिवाजी जाधव, प्रताप वरुटे, मुरलीधर जाधव, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, सचिन तोडकर, यांंची प्रमुख उपस्थिती होती.

श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी करण्यात येणाºया कायद्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीअंतर्गत येणाºया तीन हजार मंदिरांचा समावेश करून मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे. येत्या मंगळवारी व बुधवारी (दि. २१ व २२) मुंबईत होणाºया तातडीच्या बैठकीत याबाबतचा अंतिम मसुदा तयार होण्याची शक्यता असल्याने यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

संजय पवार, इंद्रजित सावंत, आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, वसंतराव मुळीक, दिलीप पाटील, आदींसह इतर मान्यवरांनी या प्रस्तावित कायद्याला विरोध करीत फक्त अंबाबाई मंदिरापुरताच कायदा करावा आणि तो डिसेंबरअखेर करावा, अन्यथा जानेवारी महिन्यात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा सरकारला देण्यात आला.अंबाबाई मंदिरातील आंदोलन हे एका समाज किंवा जातीविरोधात नाही. ते फक्त उर्मट पुजाºयांविरोधात असून शासनाचे पगारी पुजारी नेमावेत यासाठी आहे.

सरकारकडून अंबाबाई मंदिरासह पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीच्या अखत्यारीत येणाºया ३ हजार ६०० मंदिरांत सरकारी पुजारी नेमावा, अशा पद्धतीने कायदा केला जात असल्याचे समजले आहे. मुळात समितीची मागणी फक्त अंबाबाई मंदिरापुरती मर्यादित असताना सरकारकडून या मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठीच इतर मंदिरांचा समावेश करण्याचा घाट घातला जात आहे, याला समितीचा विरोध असल्याचे सांगून, अधिवेशनामध्ये अंबाबाई मंदिरापुरता पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय न झाल्यास जानेवारीत रस्त्यावर उतरण्याचा इशारा समितीच्या पदाधिकाºयांनी सरकारला दिला.पुजाºयाने दिलेल्या धमकीबाबत कारवाई नाहीकोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुभाष देसाई, दिलीप देसाई, दिलीप पाटील, सचिन तोडकर यांना धमकी पत्रे आली आहेत. याबाबत मंदिरातील पुजारी अविनाश मुनिश्वर, अजित ठाणेकरांसह इतर पुजाºयांवर संशय असून, त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार अर्ज दाखल करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या दबावामुळेच ही कारवाई होत नाही, असा आरोप करीत याबाबतचे निवेदन इमेलद्वारे करवीर निवासिनी अंबाबाई पुजारी हटाव कृती समितीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना पाठविण्यात आले. निवेदनावर डॉ. सुभाष देसाई, दिलीप पाटील, दिलीप देसाई, डॉ. राजश्री चव्हाण, अ‍ॅड. चारुलता चव्हाण, आनंद माने, सचिन तोडकर यांच्या स्वाक्षºया आहेत.पुजाºयाने दिलेल्या धमकीबाबत कारवाई नाहीकोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुभाष देसाई, दिलीप देसाई, दिलीप पाटील, सचिन तोडकर यांना धमकी पत्रे आली आहेत. याबाबत मंदिरातील पुजारी अविनाश मुनिश्वर, अजित ठाणेकरांसह इतर पुजाºयांवर संशय असून, त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार अर्ज दाखल करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या दबावामुळेच ही कारवाई होत नाही, असा आरोप करीत याबाबतचे निवेदन इमेलद्वारे करवीर निवासिनी अंबाबाई पुजारी हटाव कृती समितीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना पाठविण्यात आले. निवेदनावर डॉ. सुभाष देसाई, दिलीप पाटील, दिलीप देसाई, डॉ. राजश्री चव्हाण, अ‍ॅड. चारुलता चव्हाण, आनंद माने, सचिन तोडकर यांच्या स्वाक्षºया आहेत.‘लोकमत’मधून सर्वप्रथम वृत्त‘पगारी पुजारी नेमण्याच्या मुद्द्याला बगल’ या मथळ्याखाली काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त देऊन अंबाबाई मंदिरासह पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीच्या अखत्यारीतील अन्य मंदिरांमध्येही पगारी पुजारी नेमावा, या दृष्टीने कायदा करण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याचे वृत्त देऊन या विषयाला वाचा फोडली होती.जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नयेपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिसेंबरपूर्वी अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्याचे तसेच अडचणी आल्यास याबाबत वटहुुकूम काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यावर कोल्हापूरकरांनी विश्वास ठेवला आहे. या विश्वासाला त्यांनी तडा जाऊ देऊ नये, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.मुख्यमंत्र्यांची भेट घेणारपुजारी हटाओ हाच समितीचा अजेंडा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौºयावर येत आहेत. त्यावेळी त्यांची भेट घेऊन समितीचे मत व जनतेच्या भावना मांडल्या जाणार आहेत.