शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

वडील जिवंत असते तर...लाल माती -- हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवनकहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 11:24 PM

कुस्ती जिंकून गावी गेलो तेंव्हा गावातील लोक स्वागताला आले होते.

कुस्ती जिंकून गावी गेलो तेंव्हा गावातील लोक स्वागताला आले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव होते. वडिलांच्या निधनानंतर मुलाने नाव कमावल्याचे समाधान आईच्या चेहºयावर दिसत होते...मला आजही चांगले आठवते की, आम्ही जेव्हा लाल मातीत लढत होतो, तेव्हा मल्लांना खूप चांगला मानसन्मान मिळायचा; परंतु तुलनेत पैसे कमी मिळायचे. ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी जेव्हा मी जळगावला गेलो तेव्हा दिवसाचा भत्ता १० रुपये होता. पाच दिवसांचे ५० रुपये मिळायचे. हिंदकेसरी झालेल्या मल्लासही एवढीच रक्कम मिळायची. प्रवासखर्च ज्याचा त्याने करायचा; परंतु त्याबद्दल मनात जराही किंतु नसायची. जे मिळेल त्याबद्दल अफाट खुशी, आनंद वाटायचा. आता अगदी अलीकडेच हा भत्ता वाढविण्यात आला आहे. आम्ही त्यावेळी तसा विचार करता चार हजारांच्या लायकीचे पैलवान पण ध्यानीमनी नसताना मला गणपतराव तिरपणकर यांच्या बरोबरीच्या लढतीतून १० हजार बक्षीस मिळाले. त्यावेळी १८० रुपये तोळा सोने होते. आमच्या चुलत्याने बक्षिसाच्या रकमेतून १० तोळ्यांचे बिस्कीट घेतले.कुस्ती जिंकल्याचा चुलत्यांना चांगलाच आनंद झाला व त्यांनी ‘आनंद से गाव जाओ..’ असे सांगितले. मी मुंबईहून काशी एक्सप्रेसने गावी गेलो. बोरीबंदर ते बनारस अशी रेल्वे होती. गावाला जाण्यासाठी आम्हांला कपशेट्टी रेल्वेस्थानकावर उतरावे लागे. तिथे माझ्या स्वागताला गावांतील खूप लोक आले होते. त्यांच्या हातात झेंडूच्या फुलांचे हार होते. त्यांना माझा मोठा अभिमान वाटत होता. चांदीची गदा पाहून ते लोक भारावून गेले. प्रत्येकजण कुतूहलाने गदेला हात लावत होता. ती न्याहाळत होता. रेल्वे स्टेशनपासून आमचे कुत्तूपूर गाव चार किलोमीटर होते. तेवढे अंतर आम्ही चालतच गेलो.घरी गेलो तेव्हा घरातील सर्व महिला स्वागतासाठी तयार होत्या. उत्तर भारतीय समाजात चेहरा अर्धा झाकेल एवढा घुंघट घेण्याची पद्धत असे. त्यामुळे त्या महिला कोण आहेत हे समजण्यासारखे नव्हते. त्यात मी इतक्या वर्षांनंतर घरी गेलो होतो. चुलत्यांनी मला आईला ओळख पाहू असे सांगितले. मी त्यातूनही आईला ओळखले व खाली वाकून नमस्कार केला. आईला खूप आनंद झाला. ‘मोठा हो... खूप यश मिळव,’ असा आशीर्वाद तिने दिला. वडिलांच्या निधनानंतर मुलाने नाव कमावल्याचे समाधान तिच्या चेहºयावर चमकत होते. माझ्या स्वागताला आजूबाजूचे लोक आले होते. आमचे घर त्याने भरून गेले होते. मी बाहेर आलो, त्यावेळी आमच्या गावात हुसैनी दप्तरी नावाचा एक मुस्लिम माणूस सारंगी वाजवून भिक्षा मागायचा. त्याच्यासमोरून मी रुबाबात चालत गेलेला त्याने पाहिले होते. मला पाहून तो कसे म्हणाला,‘ तू काय का केसरी रे... इतनी आखड के क्यूॅँ चल रहा रे..? आतरभाई तेरे से भी बहोत जबर था..!’ ते ऐकून मनाला वाटले की, आज माझे वडील जिवंत असते तर..त्यांना किती आनंद झाला असता..महाराष्ट्र केसरीची मी जिंकून आणलेली गदा पाहून ते किती खूश झाले असते! मी सहा वर्षांचा असताना वडिलांच्या मायेचे छत्र हरपले. त्यावेळी मला पाहून आमचे चुलते म्हणायचे की, यह तो आतर भैया का आधा भी नहीं...’ ते ऐकून माझ्या वडिलांची प्रकृती कशी असेल याचा अंदाज आला. त्यांना माझ्यासारखा ‘महाराष्ट्र केसरी’सुद्धा भावला नाही. अलकनारायण सिंग हा माझा चुलतभाऊ होता. तो मला भेटला व म्हणाला,‘वो इशारा सच निकला...’ त्याने मला शाळेतील एक आठवण सांगितली. शाळेचा तो शेवटचा दिवस होता. आम्ही दोघेच गावातील तलावाजवळ बसलो होतो. शाळा तर सुटली होती. त्यामुळे पुढे भविष्यात काय करायचे याचा विचार मनात सुरू होता. भविष्याची चिंताही होती. त्याचवेळी आमच्या समोरून लुंबडी आडवी गेली. आमच्याकडे हा प्राणी तुमच्या आडवा गेला तर तो शुभशकुन असल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात जसे मुंगसाचे तोंड पाहिल्यावर काहीतरी चांगले घडेल असे म्हटले जाते तसे..! त्यामुळे मी गावात आल्यावर तो भाऊ आला व माझ्या खांद्यावर हात ठेवून मला शाबासकी दिली. हा भाऊ अजूनही जिवंत आहे. गावात १३ दिवस राहिलो. सगळ्यांना भेटलो. गावपांढरीतील ते दिवस वेगळाच आनंद देऊन गेले. त्याचदरम्यान कोल्हापूरहून पोस्ट कार्ड आले. ‘कुस्ती ठरली आहे आणि लगेच निघून ये,’ असा निरोप होता. त्यामुळे बॅग घेतली आणि कोल्हापूरच्या वाटेला लागलो.- शब्दांकन : विश्वास पाटील

वडील जिवंत असते तर...लाल माती -- हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवनकहाणीकुस्ती जिंकून गावी गेलो तेंव्हा गावातील लोक स्वागताला आले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव होते. वडिलांच्या निधनानंतर मुलाने नाव कमावल्याचे समाधान आईच्या चेहºयावर दिसत होते...मला आजही चांगले आठवते की, आम्ही जेव्हा लाल मातीत लढत होतो, तेव्हा मल्लांना खूप चांगला मानसन्मान मिळायचा; परंतु तुलनेत पैसे कमी मिळायचे. ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी जेव्हा मी जळगावला गेलो तेव्हा दिवसाचा भत्ता १० रुपये होता. पाच दिवसांचे ५० रुपये मिळायचे. हिंदकेसरी झालेल्या मल्लासही एवढीच रक्कम मिळायची. प्रवासखर्च ज्याचा त्याने करायचा; परंतु त्याबद्दल मनात जराही किंतु नसायची. जे मिळेल त्याबद्दल अफाट खुशी, आनंद वाटायचा. आता अगदी अलीकडेच हा भत्ता वाढविण्यात आला आहे. आम्ही त्यावेळी तसा विचार करता चार हजारांच्या लायकीचे पैलवान पण ध्यानीमनी नसताना मला गणपतराव तिरपणकर यांच्या बरोबरीच्या लढतीतून १० हजार बक्षीस मिळाले. त्यावेळी १८० रुपये तोळा सोने होते. आमच्या चुलत्याने बक्षिसाच्या रकमेतून १० तोळ्यांचे बिस्कीट घेतले.कुस्ती जिंकल्याचा चुलत्यांना चांगलाच आनंद झाला व त्यांनी ‘आनंद से गाव जाओ..’ असे सांगितले. मी मुंबईहून काशी एक्सप्रेसने गावी गेलो. बोरीबंदर ते बनारस अशी रेल्वे होती. गावाला जाण्यासाठी आम्हांला कपशेट्टी रेल्वेस्थानकावर उतरावे लागे. तिथे माझ्या स्वागताला गावांतील खूप लोक आले होते. त्यांच्या हातात झेंडूच्या फुलांचे हार होते. त्यांना माझा मोठा अभिमान वाटत होता. चांदीची गदा पाहून ते लोक भारावून गेले. प्रत्येकजण कुतूहलाने गदेला हात लावत होता. ती न्याहाळत होता. रेल्वे स्टेशनपासून आमचे कुत्तूपूर गाव चार किलोमीटर होते. तेवढे अंतर आम्ही चालतच गेलो.घरी गेलो तेव्हा घरातील सर्व महिला स्वागतासाठी तयार होत्या. उत्तर भारतीय समाजात चेहरा अर्धा झाकेल एवढा घुंघट घेण्याची पद्धत असे. त्यामुळे त्या महिला कोण आहेत हे समजण्यासारखे नव्हते. त्यात मी इतक्या वर्षांनंतर घरी गेलो होतो. चुलत्यांनी मला आईला ओळख पाहू असे सांगितले. मी त्यातूनही आईला ओळखले व खाली वाकून नमस्कार केला. आईला खूप आनंद झाला. ‘मोठा हो... खूप यश मिळव,’ असा आशीर्वाद तिने दिला. वडिलांच्या निधनानंतर मुलाने नाव कमावल्याचे समाधान तिच्या चेहºयावर चमकत होते. माझ्या स्वागताला आजूबाजूचे लोक आले होते. आमचे घर त्याने भरून गेले होते. मी बाहेर आलो, त्यावेळी आमच्या गावात हुसैनी दप्तरी नावाचा एक मुस्लिम माणूस सारंगी वाजवून भिक्षा मागायचा. त्याच्यासमोरून मी रुबाबात चालत गेलेला त्याने पाहिले होते. मला पाहून तो कसे म्हणाला,‘ तू काय का केसरी रे... इतनी आखड के क्यूॅँ चल रहा रे..? आतरभाई तेरे से भी बहोत जबर था..!’ ते ऐकून मनाला वाटले की, आज माझे वडील जिवंत असते तर..त्यांना किती आनंद झाला असता..महाराष्ट्र केसरीची मी जिंकून आणलेली गदा पाहून ते किती खूश झाले असते! मी सहा वर्षांचा असताना वडिलांच्या मायेचे छत्र हरपले. त्यावेळी मला पाहून आमचे चुलते म्हणायचे की, यह तो आतर भैया का आधा भी नहीं...’ ते ऐकून माझ्या वडिलांची प्रकृती कशी असेल याचा अंदाज आला. त्यांना माझ्यासारखा ‘महाराष्ट्र केसरी’सुद्धा भावला नाही. अलकनारायण सिंग हा माझा चुलतभाऊ होता. तो मला भेटला व म्हणाला,‘वो इशारा सच निकला...’ त्याने मला शाळेतील एक आठवण सांगितली. शाळेचा तो शेवटचा दिवस होता. आम्ही दोघेच गावातील तलावाजवळ बसलो होतो. शाळा तर सुटली होती. त्यामुळे पुढे भविष्यात काय करायचे याचा विचार मनात सुरू होता. भविष्याची चिंताही होती. त्याचवेळी आमच्या समोरून लुंबडी आडवी गेली. आमच्याकडे हा प्राणी तुमच्या आडवा गेला तर तो शुभशकुन असल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात जसे मुंगसाचे तोंड पाहिल्यावर काहीतरी चांगले घडेल असे म्हटले जाते तसे..! त्यामुळे मी गावात आल्यावर तो भाऊ आला व माझ्या खांद्यावर हात ठेवून मला शाबासकी दिली. हा भाऊ अजूनही जिवंत आहे. गावात १३ दिवस राहिलो. सगळ्यांना भेटलो. गावपांढरीतील ते दिवस वेगळाच आनंद देऊन गेले. त्याचदरम्यान कोल्हापूरहून पोस्ट कार्ड आले. ‘कुस्ती ठरली आहे आणि लगेच निघून ये,’ असा निरोप होता. त्यामुळे बॅग घेतली आणि कोल्हापूरच्या वाटेला लागलो. 

- शब्दांकन : विश्वास पाटील