शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांत दवाखाना नवीन इमारतीत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. तरी जुन्या इमारतीतून हा दवाखाना नवीन इमारतीत सुरू करावा व अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,

सांगरूळ : येथे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचा दवाखाना सुरू आहे. या दवाखान्यांतर्गत ८ ते १० गावे येतात. सध्या सुरू असलेला दवाखाना मोडकळीस आल्याने व जागेचा अभाव असल्याने प्रशासनाने नवीन जागेत उभारलेल्या इमारतीत दवाखाना सुरू करावा, या मागणीसाठी नागरिकांनी शुक्रवारी ग्रामप्रशासनास निवेदन दिले. दरम्यान, पंधरा दिवसांत दवाखाना नवीन इमारतीत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला.सांगरूळ हे परिसरातील गावासाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सांगरूळ येथे जनावरांचा दवाखाना सुरू केला. पूर्वी जनावरांची संख्या कमी होती. त्यामुळे चांगल्या सुविधा मिळत होत्या. सध्या सुरू असलेल्या दवाखान्याची इमारत जुनी असून ती मोडकळीस आली आहे. तसेच सांगरूळसह परिसरातील गावांत जनावरांचे प्रमाणही वाढले आहे. या जनावरांवर उपचार करण्यासाठी नवनवीन यंत्रांचा वापर केला जातो. मात्र, सध्याची इमारत यासाठी अपुरी पडत असल्याने जिल्हा परिषद फंडातून गावातील मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त जागेत मोठी इमारत बांधण्यात आली. ही इमारत बांधून चार वर्षे झाली आहेत. मात्र, आजही दवाखाना जुन्याच इमारतीत सुरू आहे. यामुळे नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. तरी जुन्या इमारतीतून हा दवाखाना नवीन इमारतीत सुरू करावा व अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी ग्रामस्थांनी निवेदन दिले.यावेळी निवास वातकर, जनादर्शन खाडे, सुशांत नाळे, सरदार खाडे, संभाजी नाळे, प्रशांत खाडे, बाजीराव वातकर, विलास किल्लेदार, संभाजी खाडे, प्रदीप नाळे, प्रमोद नाळे, विजय नाळे, आनंदराव खाडे, उपसरपंच रवींद्र खाडे, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव खाडे, ग्रामसेवक एस. एस. दिंडे उपस्थित होते.