शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

युती धर्म पाळल्यास भाजप-सेनेकडे पुन्हा सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:46 AM

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सध्या जिल्हा परिषदेत भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असली तरी शिवसेनेचे पाच ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सध्या जिल्हा परिषदेत भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असली तरी शिवसेनेचे पाच सदस्य विरोधात आहेत; काँग्रेस, राष्ट्रवादीला मानणाऱ्या पाचजणांनी भाजपचा अध्यक्ष होण्यास मदत केली आहे. अशा परिस्थितीत सध्या सत्तारूढ भाजप मित्रपक्षांकडे ६७ पैकी ३७ सदस्य असून विरोधकांकडे २८ सदस्य आहेत. भाजप-शिवसेना युतीचा निर्णय झाल्यानंतर खरोखरच जर युतीधर्म पाळला गेला तरी केवळ जनसुराज्यच्या पाठिंब्यावर पुन्हा युतीची अध्यक्ष होऊ शकतो अशी आजची स्थिती आहे. ही आकडेवारी ३५ विरोधात ३२ अशी राहणार आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांच्यात अध्यक्षपदासाठीची लढत होणार असताना महाडिक यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या युवक आघाडीचे दोन सदस्य, पी. एन. पाटील यांच्यावरील रागापोटी प्रकाश आवाडे यांच्या आघाडीचे दोन सदस्य आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन सदस्य राहिले. ‘जनसुराज्य’शी त्याआधीच चर्चा झाल्याने त्यांचे सहा सदस्य आणि एक अपक्ष महाडिक यांच्या पाठीशी राहिले.शिवसेनेच्या चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर आणि संजय घाटगे यांच्या सात सदस्यांनी महाडिक यांच्यासाठी भाजपला पाठिंबा दिला. तर प्रकाश आबिटकर यांच्या आघाडीचे तीन आणि उल्हास पाटील, संजय मंडलिक गटाचा प्रत्येकी एक असे पाच सदस्य राष्ट्रवादी, कॉँग्रेससोबत राहिले. यामुळे शौमिका महाडिक यांचा विजय निश्चित झाला आणि ऐनवेळी राहुल पाटील यांचे नाव माघार घेण्यात आले. बदलत्या परिस्थितीत प्रकाश आवाडे यांनी जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बदलणार असल्याची घोषणा केली आहे. अशातच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना- भाजप युती झाल्याने जर या दोन्ही पक्षांनी मनापासून युती मनावर घेतली तर पुन्हा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याची त्यांना सप्टेंबरमध्ये संधी मिळणार आहे. परंतु त्यासाठी जनसुराज्यचे सहा सदस्यांचे पाठबळ मोलाचे ठरणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय कॉंग्रेसने ज्या ठिकाणी शिवसेना, भाजपसोबत आघाड्या केल्या आहेत, त्या विसर्जित कराव्यात असे धोरण ठरविण्यात येत आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाºया नव्या अध्यक्षपदाच्या निवडीत चुरस निर्माण होणार आहे.लोकसभेच्या विजयावरही गणितेलोकसभा निवडणुकीमध्ये संजय मंडलिक बाजी मारणार की धनंजय महाडिक यावरही जिल्हा परिषदेच्या आगामी हालचाली अवलंबून आहेत.या ठिकाणचा विजय जिल्ह्याच्या राजकारणालाही कलाटणीदेणारा ठरणार आहे.आघाडी धर्म पाळल्यास अशी असेल स्थितीभाजप, शिवसेना, जनसुराज्यभाजप १४जनसुराज्य ०६ताराराणी (महाडिक) आघाडी ०३आमदार चंद्रदीप नरके गट ०३आमदार सत्यजित पाटील गट ०२आमदार सुजित मिणचेकर ०१माजी आमदार संजय घाटगे ०१आबिटकर आघाडी, शिवसेना ०३आमदार उल्हास पाटील ०१संजय मंडलिक गट ०१काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानकाँग्रेस १४राष्ट्रवादी ११चंदगड (कुपेकर)आघाडी ०२आवाडे गट ०२स्वाभिमानी शेतकरी संघटना ०२अपक्ष रसिका पाटील ०१