इचलकरंजीत तरुणाची महिला पोलिसांशी अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:25 AM2021-05-09T04:25:48+5:302021-05-09T04:25:48+5:30

इचलकरंजी : शहरात लॉकडाऊन असतानाही विनाकारण मास्क न लावता मोटारसायकलवरून फिरत असताना एका तरुणावर स्टेशन रोडजवळ पोलिसांनी कारवाई केली. ...

Ichalkaranjit youth's quarrel with female police | इचलकरंजीत तरुणाची महिला पोलिसांशी अरेरावी

इचलकरंजीत तरुणाची महिला पोलिसांशी अरेरावी

Next

इचलकरंजी : शहरात लॉकडाऊन असतानाही विनाकारण मास्क न लावता मोटारसायकलवरून फिरत असताना एका तरुणावर स्टेशन रोडजवळ पोलिसांनी कारवाई केली. महेश अप्पासाहेब माळी (रा. लिगाडे मळा, जवाहरनगर), असे त्याचे नाव असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी त्याने बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांशी अरेरावी करीत वर्दी उतरून दाखविण्याची धमकी दिली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरात संचारबंदी असल्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत आहेत. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तरीही काही तरुणमंडळी व नागरिक शहरात बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत कडक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस स्टेशन रोडवर बंदोबस्तासाठी असताना महेश माळी याला मोटारसायकलवरून विनामास्क फिरत असताना पकडले. त्याला महिला पोलिसांनी मास्क न घालता विनाकारण कशासाठी फिरत आहेस, असे विचारले. यावेळी त्याने महिला पोलिसांबरोबर हुज्जत घालत वर्दी उतरूनच दाखवितो, अशी धमकी दिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांना त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. याची माहिती मिळताच शहरातील आजी-माजी नगरसेवकांसह त्याच्या समर्थकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.

Web Title: Ichalkaranjit youth's quarrel with female police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.