शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Kolhapur: सेल्फी काढताना पाय घसरून इचलकरंजीचा तरुण गेला वाहून, काळम्मावाडी धरणाजवळ घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 16:30 IST

रेस्क्यु टीमसह शोधकार्य सुरु

गौरव सांगावकरराधानगरी : काळम्मावाडी धरणाजवळ वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढताना पाय घसरून इचलकरंजीचा तरुण वाहून गेला. उज्वल कमलेश गिरी (वय २१ रा.कोरोची माळ, ता. हातकणंगले, मूळ बिहार) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.काळम्मावाडी धरणाजवळ वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारे पाणी कालव्याद्वारे नदीत सोडले जाते. काही अंतर पुढे गेल्यानंतर कोसळणारे पाण्याचे छोट्याशा नयनरम्य धबधब्यात रूपांतर होते. आणि हेच कोसळणारे पाणी पाहण्यासाठी अनेक   पर्यटक याठिकाणी गर्दी करतात. आज सकाळी उज्वल गिरी हा मित्रांसोबत फिरायला आला होता. दरम्यान सेल्फी काढताना तो पाय घसरून पाण्यात पडला. तो अद्याप मिळाला नाही. घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिस रेस्क्यु टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेस्क्यु टीमसह सदर व्यक्तीचा शोध घेत आहेत.मे महिना सुट्टीचे दिवस चालू असल्याने अनेक पर्यटक राधानगरी, कळम्मावाडी येथे येत असतात. पण काही अती उत्साही तरुण जोशामध्ये पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरणे, सेल्फी काढणे या सारखे प्रकार करीत असतात. अशा उत्साही पर्यटकांच्या बेफिकिरीमुळे दुर्घटना घडतात. यापूर्वी तोरस्करवाडी येथे गारगोटीचा प्रणव कलगुटकी हा १९ वर्षाचा तरुण डोहात बुडाला होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेichalkaranji-acइचलकरंजी