शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

इचलकरंजीत महिलांचा ‘चेन स्नॅचर’मध्ये समावेश

By admin | Updated: December 19, 2014 00:12 IST

तिसऱ्या दिवशीही धुमाकूळ : धूम स्टाईलने आठ तोळे सोने लंपास

इचलकरंजी : शहरात धूम स्टाईलने गंठण चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, सलग तिसऱ्या दिवशीही चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने धूम स्टाईलने लंपास केले. विशेष म्हणजे मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांमध्ये एका महिलेचाही समावेश होता. नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, ते पसार झाले. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या मंजुश्री विशाल जवळगी या जवाहरनगरमध्ये राहणाऱ्या नातेवाइकांकडे वास्तुशांतीसाठी गेल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या आपल्या मुलगीला बरोबर घेऊन गुरू चित्रमंदिर, संजीवनी हॉस्पिटलमार्गे स्कुटीवरून काल, बुधवारी संध्याकाळी घरी परत जात होत्या. त्या राजीव गांधी भवनसमोर आल्या असता पाठीमागून आलेल्या अ‍ॅक्टिव्हा मोटारसायकलवरील अज्ञातांनी मंजुश्री यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, राणीहार असे सुमारे अडीच लाखांचे आठ तोळ्यांचे दागिने हिसडा मारून पलायन केले. मंजुश्री यांनी आरडाओरडा केल्याने नागरिकांनी विक्रमनगर भागापर्यंत त्या मोटारसायकलीचा पाठलाग केला. मात्र, पाठलाग करूनही चोरटे मिळून आले नाहीत. त्या अ‍ॅक्टिव्हा गाडीवर मागील सीटवर एक महिला असल्याचेही नागरिकांनी सांगितले. चोरटे मिळून न आल्याने मंजुश्री जवळगी यांनी गावभाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप कारंडे करीत आहेत. दरम्यान, घटनेनंतर तत्काळ हालचाल करीत गावभाग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी युवतीस संशयावरून ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली. तसेच तक्रारदार मंजुश्री व नागरिकांसमोर त्या युवतीला उभे करून ओळखण्यास सांगितले. मात्र, या चोरीमध्ये तिचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याने तिची मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)