शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: इचलकरंजी स्वतंत्र तालुका होणार? प्रस्ताव सादर करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 14:28 IST

हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी व हातकणंगले असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, इचलकरंजीत तहसील कार्यालय नाही.

इचलकरंजी : शहराला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्यासह याठिकाणी तहसील कार्यालय सुरु करण्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून, इचलकरंजी आता स्वतंत्र तालुका होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.हातकणंगले तालुक्याची लोकसंख्या आठ लाखापेक्षा अधिक आहे. सध्या इचलकरंजी येथे महाराष्ट्र महसूल व वन विभागाकडील शासननिर्णयानुसार अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन केले आहे. अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कक्षेत कबनूर, कोरोची, रांगोळी, रेंदाळ व पट्टणकोडोली या मोठ्या लोकसंख्येच्या गावांसह इचलकरंजी महापालिका व हुपरी नगरपालिका यांचा समावेश केला आहे. इचलकरंजी येथे उपविभागीय कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालये, पोलीस उपअधीक्षक कार्यालय, तीन पोलीस ठाणे व इतर सरकारी आस्थापना अशी अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी व हातकणंगले असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, इचलकरंजीत तहसील कार्यालय नाही.इचलकरंजीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा व तहसीलदार कार्यालय व्हावे, हा प्रस्ताव प्रदीर्घ काळापासून शासनाकडे प्रलंबित आहे. इचलकरंजी शहराचा भौगोलिक विकास व कामे गतीने होण्यासाठी इचलकरंजी येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाऐवजी कबनूर, कोरोची, चंदूर, तारदाळ व खोतवाडी या पाच गावांसह इचलकरंजीला स्वतंत्र तालुका म्हणून मंजुरी देऊन तहसील कार्यालय सुरू व्हावे, अशी मागणी केली होती. ती आता पूर्ण होणार आहे.

तहसीलदार कार्यालय हातकणंगलेत असले तरी त्या तुलनेत जवळपास ६० टक्के काम हे इचलकरंजीतील अप्पर तहसीलदार कार्यालयात होत आहे. त्यामुळे इचलकरंजीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळणे अत्यंत गरजेचे असून, स्वतंत्र तालुका झाल्यास येथील कामे आणखीन गतीने होण्यास मदत होणार आहे. -प्रकाश आवाडे, आमदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीPrakash Awadeप्रकाश आवाडे