इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शुक्रवारचा आठवडी बाजार नियोजित १८ ठिकाणी भरवण्यात आला. त्यामुळे नेहमीच्या भाजी मार्केटमध्ये भरवला जाणारा बाजार ओस पडला होता.
शहर व परिसरातील विकली मार्केट, थोरात चौक, अण्णा रामगोंडा शाळेजवळ यासह अन्य प्रमुख ठिकाणी आठवडी बाजार भरत होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी शहरातील १८ ठिकाणी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेत बाजार भरविण्याचा निर्णय नगरपालिकेच्या सनियंत्रण बैठकीत जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये थोरात चौक येथे भरणारा आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विक्रेत्यांनी नियोजित जागेवर बाजार भरविला. नागरिकांनीही आपापल्या भागातील बाजारामध्ये जाऊन भाजी खरेदी केली.
फोटो ओळी
०२०४२०२१-आयसीएच-०६
विकली मार्केटमध्ये आठवडी बाजार भरला नाही. त्यामुळे मार्केट ओस पडले होते.
०२०४२०२१-आयसीएच-०७
थोरात चौकातील भाजीमार्केटही ओस पडले होते.