शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांनी तीन मुलांचा घेतला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 18:57 IST

DogBite Hospital Ichlkarnaji Kolhapur- जवाहरनगर येथील तीन मुलांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. यामध्ये ते जखमी झाले असून, त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. एकाच वेळी तीन मुलांचा कुत्र्यांनी चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पालिकेने कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.

ठळक मुद्देइचलकरंजीत भटक्या कुत्र्यांनी तीन मुलांचा घेतला चावाअडीच वर्षाच्या बालकाचा समावेश

इचलकरंजी : जवाहरनगर येथील तीन मुलांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. यामध्ये ते जखमी झाले असून, त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. एकाच वेळी तीन मुलांचा कुत्र्यांनी चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पालिकेने कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.आदित्य अनिल शिरगावे (वय ६, रा. स्वामी कारखान्याजवळ), अरफान रफिक बागवान (अडीच वर्षे, रा. मासाळ गल्ली) व वेदांत प्रभाकर सुतार (१३, रा. जवाहरनगर) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, जवाहरनगर येथे सकाळच्या सुमारास परिसरातील मुले घराबाहेर खेळत होती. त्यावेळी भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामध्ये आदित्य याच्या मांडीला व पृष्ठभागाला आणि अरफान याच्या छातीच्या उजव्या बाजूला चावा घेतला. त्यामुळे मुले आरडाओरडा करू लागले.

त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. कुत्र्याच्या तावडीतून मुलांना सोडवून आयजीएम रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जवाहरनगरातील वेदांत याच्या पायाला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्यालाही आयजीएम दाखल केले आहे. परिसरातील घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती.भटक्या कुत्र्यांचा उच्छांदपंधरा दिवसांपूर्वी तांबे माळ, लिंबू चौक , गुरूकन्नननगर परिसरातील भटक्या कुत्र्यांनी दहा ते बाराजणांचा चावा घेतला होता. त्यावेळी परिसरातील नागरिक काठी घेवून मध्यरात्रीपर्यंत या कुत्र्यांचा पाठलाग करीत होते. भटक्या कुत्र्यांचा उच्छांद वाढला असून, त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :dogकुत्राhospitalहॉस्पिटलichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर