शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

‘एसएफआय’च्या निरीक्षणाखाली उद्या इचलकरंजीत जलतरण स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 11:27 IST

कोल्हापुरातील जलतरण निवड चाचणी घेण्याची जबाबदारी स्विमिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्रने माझ्यावर आणि स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या (एसएफआय) तीन निरीक्षकांवर सोपविली आहे. त्यानुसार शनिवारी (दि. १८) इचलकरंजीतील शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथे निवड चाचणी स्पर्धा होईल. त्यामध्ये कोणत्याही संघटनेचा हस्तक्षेप असणार नाही. एसएफआयने सकारात्मक भूमिका घेतल्याने पालकांनी या स्पर्धेवरील बहिष्कार मागे घेतला आहे, अशी माहिती या स्पर्धेचे एसएफआय नियुक्त संचालक विक्रम खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे‘एसएफआय’च्या निरीक्षणाखाली उद्या इचलकरंजीत जलतरण स्पर्धाविक्रम खाडे यांनी दिली माहिती ; पालकांचा बहिष्कार मागे

कोल्हापूर : कोल्हापुरातील जलतरण निवड चाचणी घेण्याची जबाबदारी स्विमिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्रने माझ्यावर आणि स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या (एसएफआय) तीन निरीक्षकांवर सोपविली आहे. त्यानुसार शनिवारी (दि. १८) इचलकरंजीतील शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथे निवड चाचणी स्पर्धा होईल. त्यामध्ये कोणत्याही संघटनेचा हस्तक्षेप असणार नाही. एसएफआयने सकारात्मक भूमिका घेतल्याने पालकांनी या स्पर्धेवरील बहिष्कार मागे घेतला आहे, अशी माहिती या स्पर्धेचे एसएफआय नियुक्त संचालक विक्रम खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.खाडे म्हणाले, जिल्हास्तरीय निवड चाचणीबाबत अधिकृत संघटना कोणती याबाबत वाद आहेत, अशा स्थितीत स्विमिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्रने दोन्ही संघटनांना अलिप्त ठेवले असून, निवड चाचणी घेण्यासाठी या स्पर्धेचे संचालक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून जबाबदारी मी स्वीकारली आहे.

या स्पर्धेसाठी एसएफआयचे सदस्य नीता तळवलकर, कमलेश नगरकर, संतोष पाटील हे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या चाचणीतील प्रत्येक गटातील एक ते सहा क्रमांकाचे विजेते खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडण्यात येतील. निवड झालेले खेळाडू दि. ३१ मे ते दि. २ जून दरम्यान बालेवाडी (पुणे) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करतील.

शनिवारी सकाळी आठ वाजता स्पर्धा सुरू होईल. वय वर्षे ९ ते १०, ११, १२ ते १४, १५ ते १७ या गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. निवड चाचणी असल्याने खेळाडूंना पदक अथवा प्रमाणपत्र दिले जाणार नाही. या पत्रकार परिषदेस प्रशिक्षक मानसिंग पाटील, निळकंठ आखाडे, पालक कृती समितीचे रमेश मोरे, शशांक देशपांडे, गणेश देसाई, जीवन बोडगे, सतीश पाटील, समीर चौगुले, आदी उपस्थित होते.प्रशिक्षकांकडे प्रवेशिका द्याव्यातस्पर्धेबाबत पालक, खेळाडूंनी संभ्रमावस्थेत राहू नये. खेळाडूंनी त्यांच्या प्रवेशिका प्रशिक्षकांकडे आज, शुक्रवारी सायंकाळी सातपर्यंत जमा करावी. त्यासमवेत आधारकार्ड, जन्मतारखेचा दाखला सादर करावा. स्पॉट एंट्री घेतली जाणार नसल्याचे खाडे यांनी सांगितले.

आणखी ‘वीरधवल’ घडवूयाआंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडे याच्यानंतर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे फारसे खेळाडू चमकलेले नाहीत; त्यामुळे कोणत्याही वादात अडकण्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून कोल्हापूरमधून आणखी ‘वीरधवल’ घडविण्यावर भर देऊया, असे आवाहन खाडे यांनी केले. 

 

टॅग्स :Swimmingपोहणेkolhapurकोल्हापूर