शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ST Strike : इचलकरंजीत एस.टी.कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू, कर्मचारी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 19:01 IST

कारणे दाखवा नोटिसीमुळे आलेले दडपण आणि मुंबई येथील बैठकीत एस.टी. कर्मचाऱ्याच्या मागण्यांबाबत तोडगा न निघाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

इचलकरंजी : शहापूर (ता.हातकणंगले) येथील एस.टी.आगारासमोर सुरू असलेल्या एस.टी.कर्मचाऱ्याच्या संपातील एका वाहकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. शरणाप्पा गिरमलप्पा मुंजाळे (वय ३१, मूळ गाव अक्कलकोट) असे त्यांचे नाव आहे.दरम्यान, ५ जानेवारीला लागू केलेल्या कारणे दाखवा नोटिसीमुळे आलेले दडपण आणि मुंबई येथील बैठकीत एस.टी. कर्मचाऱ्याच्या मागण्यांबाबत तोडगा न निघाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.मुंजाळे हे मूळचे अक्कलकोटचे आहेत. साधारण दोन वर्षांपूर्वी त्यांची सिंधुदुर्ग येथून इचलकरंजीत बदली झाली होती. एस.टी.कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. सोमवारी उपोषणस्थळी सर्व कर्मचारी मुंबई येथील मंत्र्याची बैठक बघत होते. त्यावेळी मुंजाळे याला हृदयविकाराचा धक्का बसला. कर्मचाऱ्यांनी तत्काळ हालचाली करत त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी प्रशासन आणखीन कितीजणांचा बळी घेणार, असे म्हणत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गर्दी करत या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. मुंजाळे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे काम आयजीएम रुग्णालयात सुरू होते. रुग्णालयासमोर महिला कर्मचारी व नातेवाइकांनी आक्रोश केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संप