शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

इचलकरंजीत ३३ नगरसेवकांची नवी आघाडी

By admin | Updated: May 6, 2015 00:15 IST

आवाडे, हाळवणकर बाजूला : डाळ्या-चाळके-बागवान यांच्यासह राष्ट्रवादी अशा नवीन राजकारणाची जुळवणी

इचलकरंजी : नगरपालिकेमध्ये राष्ट्रीय कॉँग्रेस व भाजप यांना बाजूला ठेवून एक नवीन आघाडी उदयास आली आहे. या आघाडीने आता नगरपालिकेची सत्ता कायमपणे ताब्यात ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेतील ५७ पैकी ३३ नगरसेवक या नव्या आघाडीकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे.नवी आघाडी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार सुरेश हाळवणकर यांच्यापासून दूर राहणार असल्याने त्याचा परिणाम स्थानिक राजकीय स्थित्यंतरावर होणार आहे. त्यामुळे या आघाडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.शहर विकास आघाडीची स्थापना करून आमदार सुरेश हाळवणकर यांनी पंधरा वर्षांपूर्वी पालिकेच्या राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर सन २००४ मध्ये शहर विकास आघाडीमार्फत निवडणूक लढविली. तर २००६ मध्ये नगरपालिकेमध्ये त्यावेळी असलेले कॉँग्रेसचे काही नगरसेवक फोडले आणि पालिकेमध्ये ‘शविआ’ची सत्ता स्थापित केली. त्यानंतर सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच भाजपच्या उमेदवारीवर हाळवणकर यांनी माजी मंत्री आवाडे यांना धक्का दिला आणि ते निवडून आले. मात्र, पुढील सन २०११ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ५७ पैकी कॉँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे १० व ‘शविआ’चे १७ नगरसेवक निवडून आले. आवाडे यांनी कॉँग्रेस व राष्ट्रवादी अशी आघाडी करून पालिकेची सत्ता ताब्यात ठेवली.जून २०१४ मध्ये शुभांगी बिरंजे या नगराध्यक्षा झाल्या. पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे त्यांचा कालावधी डिसेंबरमध्ये संपत असला तरी त्यांनी त्यास नकार दिला आणि बंड केले. या बंडाला शहर विकास आघाडीने पाठिंबा दिला. तेव्हापासून ‘शविआ’चे प्रमुख सागर चाळके यांचा नगरपालिकेच्या राजकारणात शिरकाव झाला, तर कॉँग्रेसमधील सतीश डाळ्या यांचाही पालिकेत पुनर्प्रवेश झाला आणि नगराध्यक्षांच्या बंडापासूनच नवीन आघाडीची जुळवाजुळव सुरू झाली.नवीन आघाडीचे नेतृत्व चाळके, डाळ्या व बादशहा बागवान हे करीत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील जांभळे व कारंडे या दोन्ही गटांनाही आघाडीमध्ये बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या डाळ्या गटाकडे कॉँग्रेसमधील १४, तर चाळके यांच्याकडे ‘शविआ’मधील आठ नगरसेवक आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक समाविष्ट झाल्यास ही बेरीज ३३ होते. त्यामुळे नगरपालिकेचे राजकारण ताब्यात घेण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत. (प्रतिनिधी)नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये होणार असून, चाळके-डाळ्या-बागवान यांच्या आघाडीकडून ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. या आघाडीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचासुद्धा समावेश आहे. परिणामी, सन २०१६ मधील नगरपालिका निवडणूक राष्ट्रीय कॉँग्रेस, भाजप व नवीन आघाडी अशी तिरंगी होण्याचे संकेत आहेत.