शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

“मी शरद पवार यांना लपून भेटलो नाही”; गुप्त भेटीबाबत विचारल्यावर अजित पवार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 06:02 IST

पवारसाहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका, असे अजित पवार म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुणे येथे उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी बंद दाराआड चर्चा झाली. या गुप्त भेटीबाबत अजित पवार यांना विचारले असता ते चांगलेच संतापलेत. मी शरद पवार यांना काही लपून भेटलेलो नाही, असे म्हणाले. पुण्याच्या बैठकीचे कोणी मनावर घेऊ नका. पवारसाहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका, असे यावेळी अजित पवार म्हणाले.

अजित पवार मंगळावरी कोल्हापुरात होते. शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर, मराठा आरक्षण संबंधी बैठक झाली. त्यानंतर त्यांनी शरद पवार  भेटीबाबत माहिती दिली.  दरम्यान, जयंत पाटील हेही यावेळी उपस्थित होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: त्या दिवशी काय झाले याची माहितीच दिली. चोरडीया यांचे वडील शरद पवार यांचे क्लासमेंट होते. त्या दिवशी ते व्हीएसआयचा कार्यक्रम संपवून येणार होते. मी चांदणी चौकातील कार्यक्रम संपवून येणार होतो. त्या दिवशी शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही होते.  चोरडीया यांनी आम्हाला जेवायला बोलावलं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो होते, असंही अजित पवार म्हणाले.  

मराठा आरक्षण बैठकीत गोंधळ 

-  मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुण्यातील कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. -  आधी बैठकीत प्रवेश नाकारल्यामुळे तर आत सोडल्यावर बंद खोलीत बैठक का घेतली, असा सवाल केला. -  यावेळी गोंधळ झाल्याने बैठकीला गालबोट लागले. यावेळी कोल्हापूर कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. -  सातारा, पुणे येथील कार्यकर्ते उशिरा आल्याने त्यांना पोलिसांनी दारावर रोखले.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार