शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

लाभासाठी गुरु बदलणारा मी नाही, समरजित घाटगेंचा मुश्रीफांना टोला

By विश्वास पाटील | Updated: July 6, 2023 13:41 IST

'आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही माझ्या प्रचारात असतील'

कोल्हापूर : मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोण तरी बुद्रूक साठी मी भाजप सोडणार नाही. कारण मी पक्षाचा खुर्द कार्यकर्ता आहे अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष व कागलच्या शाहू सहकार समुहाचे नेते समरजित घाटगे यांनी गुरुवारी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली. मेळाव्यात त्यांनी मुश्रीफ यांना मला भाजपमधून बाहेर घालवायची घाई झाली असल्याची टीका केली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी स्वागत आणि अभिनंदन करतो कारण त्यांच्यामुळे आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही माझ्या प्रचारात असतील असे सांगून त्यांनी विधानसभा निवडणूकीचे रणशिंगही फुंकले. विक्रमी मतांनी विजयी होणार असाही विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. कागलच्या गैबी चौकात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. व्यासपीठावर भाजपचे चिन्ह, झेंडा कांहीच नसल्याने लोकांना सुरुवातीला कुतूहल वाटले. परंतू घाटगे यांनी गळ्यात भाजपचा कमळ चिन्ह असलेला स्कार्फ घालून हीच माझी राजकीय भूमिका असल्याचे जाहीर करताच जोरदार टाळ्या, शिट्यांचा गजर झाला.आमच्या रक्तात तसे संस्कार नाहीत समरजित म्हणाले, राजकारणात व व्यक्तिगत जीवनातही गुरुला वंदन करणारा मी कार्यकर्ता आहे. माझे वडिल विक्रमसिंह घाटगे यांचे स्वर्गीय वसंतदादा पाटील व यशवंतराव मोहिते हे राजकीय गुरु होते. मोहिते यांच्यामुळेच शाहू कारखान्याला परवाना मिळाला. वडिल हेच माझे सर्वार्थाने जीवनाचे गुरु. परंतू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे राजकीय गुरु. काहीतरी लाभासाठी गुरु बदलणारा मी नाही. कारण आमच्या रक्तात तसे संस्कार नाहीत. मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत साहेबांना सोडणार नाही असे म्हणणाऱ्यांनी आजपर्यंत किती गुरु बदलले याचा हिशोब नाही.मला भाजपमधून बाहेर घालवायची घाई बदललेल्या राजकीय स्थितीत नेमकी काय भूमिका घ्यायची याबद्दल संभ्रमात असल्याने दोन दिवस कार्यकर्त्यापासून व माध्यमापासून बाजूला राहिलो. त्याबद्दल तुम्हा सर्वांची मी माफी मागतो. कारण राजकारणात असलो तरी धांदात खोटं बोलण्याची सवय मला अजून लागलेली नाही. या दोन दिवसांत राज्यभरातील सगळ्या पक्षांच्या प्रमुखांचे फोन मला आले. ते फोन त्यांना कुणी करायला लावले ते पण माहित आहे. कारण त्यांना मला भाजपमधून लवकर बाहेर घालवायची घाई झाली आहे असा टोला घाटगे यांनी मुश्रीफ यांना लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफ