शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मी शेतकऱ्यांचा नेता नाही, पण शेतकऱ्यांचा मित्र - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 22:02 IST

मी शेतकऱ्यांचा नेता नाही शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकऱ्यांचा खांद्याला खांदा लावून मी शेतकऱ्यांसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत उभा आहे, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.

हातकणंगले  - मी शेतकऱ्यांचा नेता नाही शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकऱ्यांचा खांद्याला खांदा लावून मी शेतकऱ्यांसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत उभा आहे, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा प्रामुख्याने उल्लेख केला. 

हातकणंगले येथील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, ''शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक आहे. गेली कित्येक वर्षे शेतकऱ्यांचा नेताच नाही. मी शेतकऱ्यांचा नेता नाही शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकऱ्यांचा खांद्याला खांदा लावून मी शेतकऱ्यांसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत उभा राहीन. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मला हसू पाहायचे आहे.  महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला अभिमान वाटावा, असे मला वाटते. 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टींवरही निशाणा साधला. '' राजू शेट्टी काय कसली शिट्टी ? आपल्याला शिट्टी नको आहे. आपल्याला विजयाची तुतारी वाजवायची आहे. याचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे.''असे उद्धव ठाकरे म्हणाले.  उद्धव ठाकरे यांच्या भाषणामधील महत्त्वाचे मुद्दे

- मी शेतकऱ्यांचा नेता नाही शेतकऱ्यांचा मित्र - महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला अभिमान वाटावा-शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना उभी राहीली याचे मला समाधान-शेतकरी जे आंदोलन करतील त्यांच्यासोबत शिवसेना जाहीरपणे सहभाग घेईल- जिल्हा साफ करण्यासाठी पहिला खासदार घालवा चांगला खासदार दिल्लीत पाठवा- सीमेवर लढणाऱ्या जवानांना कळाल पाहिजे की भारतात काय तर महाराष्ट्रात सुद्धा मर्द जवान आहेत की जे जवानांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार निवडून आणणार आहेत 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाhatkanangle-pcहातकणंगलेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019