शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मी माजी आमदार, विधानसभेतील घटनावर माझ्या भूमिकेला महत्त्व नाही - चंद्रदीप नरके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 12:00 IST

माजी आमदार, राज्य नियोजन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आणि इतर माजी आमदारांचे काय याबाबत उत्सुकता निर्माण झाली.

कोपार्डे (कोल्हापूर) : मी माजी आमदार. विधानसभेतील घटनावर माझ्या भूमिकेला महत्त्व नाही. आज माझ्या जवळच्या नातेवाईकाचा अपघाती मृत्यू झाला असून मी तिकडे निघालो असल्याचे करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले. आपण कोणत्या बाजूला राहणार याबाबत त्यांनी बोलण्याचे टाळल्याने शिवसेनेतील बंडाळीचा मोठा दबाव माजी आमदारांच्यावर असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होते.गेल्या चार दिवसापासून शिवसेनेत चाललेली बंडाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवसेनेचे माजी आमदार गोव्यात एकत्र असल्याने तर्कवितर्क सुरू होते. प्रथम सावध भूमिका घेत सर्वांनी  याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे जाहीर केले. पण आज माजी आमदार व राज्य नियोजन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आणि इतर माजी आमदारांचे काय याबाबत उत्सुकता निर्माण झाली.आज याबाबत करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी संपर्क साधला असता मी माजी आमदार आहे. विधानसभेच्या राजकीय घडामोडीत आमच्या भूमिकेला महत्त्व नाही असे सांगितले. शिवसेनेबरोबर की एकनाथ शिंदे गटाबरोबर जाणार असे विचारले असता माझ्या जवळच्या नातेवाईकांचा अपघाती मृत्यू झाला आहे मी तिकडे निघालो आहे असे सांगितले. यामुळे या बंडाळीचा भावनिक व राजकीय दबाव निर्माण झाल्याचे त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होते.शिवसेनेने चंद्रदीप नरके यांना मागील टर्म विधानसभेची उमेदवारी देवून विधानसभेत पाठवले. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. पण निवडणुकीनंतर मविआ सरकार सत्तेत आले आणि शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी घुसमट सुरू झाली होती. जिल्ह्यातील इतर पाच शिवसेनेच्या पराभूत आमदारांची हीच अवस्था होती. विशेषतः जे पराभूत झाले त्यांचे कट्टर विरोधक काँग्रेसच होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना