शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तीन हजारपेन्शनधारक हवालदिल

By admin | Updated: February 15, 2015 00:41 IST

पेन्शनचा प्रश्न : हयातीचे दाखले देऊनही भविष्यनिर्वाह निधीचा कानाडोळा

प्रवीण देसाई ल्ल कोल्हापूर ज्यांना भविष्यनिर्वाह निधी लागू आहे, अशा खासगी क्षेत्रातील उद्योग, संस्था यांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना दिली जाणारी भविष्यनिर्वाह निधीची जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतील पेन्शनच मिळालेली नाही. या कार्यालयाच्या बोटचेप्या धोरणामुळे जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक पेन्शनधारकांना वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात एकूण जवळपास चार हजार पेन्शनर आहेत. १९९५ च्या ईपीएस ९५ कायद्यानुसार १८६ खासगी उद्योग, संस्थांमधील जे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड) भरतात, त्यांना ही पेन्शन लागू आहे. जिल्ह्यातील जवळपास चार हजार निवृत्त कर्मचारी या पेन्शनसाठी पात्र आहेत. यांतील तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांतील पेन्शनच मिळालेली नाही. ५०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत असलेली ही पेन्शन मिळण्यासाठी त्यांना ताराबाई पार्कातील या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. हयातीचे दाखले नसल्याने ही पेन्शन दिली जात नसल्याचे या कार्यालयाकडून उत्तर दिले जात आहे. वयाची साठी पार केलेला कर्मचारी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येतो. त्याला योग्य उत्तर देण्याऐवजी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी या वयोवृद्ध पेन्शनधारकांना झगडावे लागत आहे. या कार्यालयाला पेन्शनधारकाची खात्री करण्यासाठी लागणारे हयातीचे दाखले नोव्हेंबर महिन्यातच देण्यात आले आहेत. हयातीची खातरजमा ही ज्या राष्ट्रीयीकृत बॅँकेत कर्मचाऱ्याचे खाते आहे, तेथून हे दाखले या कार्यालयाकडे पाठविले जातात. त्यानंतर हे कार्यालय पेन्शनचे चेक काढते. या कार्यालयाकडे जवळपास ४००० लोकांचे हयातीचे दाखले नोव्हेंबर महिन्यातच दिले आहेत. त्यानुसार डिसेंबर महिन्यात सर्व पेन्शनधारकांना पेन्शनही मिळाली आहे; परंतु जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांतील पेन्शन न मिळण्याचे कारण हयातीचे दाखले मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे. एकदा आपण हयात असल्याचा दाखला राष्ट्रीयीकृत बॅँकेकडून या कार्यालयाला दिल्यानंतर पुन्हा तोच दाखला नाही म्हणून पेन्शन थांबविणे योग्य नाही, असा सूर पेन्शनधारकांमधून उमटत आहे. जर डिसेंबर महिन्यातील पेन्शन मिळते, तर आता का नाही? असा सवालही उपस्थित केला जात आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकांकडून हयातीचे दाखले या कार्यालयाला देण्यात आले आहेत; परंतु संगणकातील सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे ते मिळाले नसल्याचे या कार्यालयाचे म्हणणे आहे; परंतु पेन्शन केव्हा मिळणार हे सांगण्यास येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जिवावर येते. विचारणा करण्यासाठी आलेल्या पेन्शनधारकांना मार्चनंतर बघूया, अशी उत्तरे दिली जातात, अशी पेन्शनधारकांची तक्रार आहे. यामुळे चौकशीसाठी फक्त हेलपाटेच मारून हातात काहीच पडत नसल्याने पेन्शनधारकांतून संतप्त सूर उमटत आहे.