शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

काळम्मावाडी कालव्यास गळती, शेती नापीकीचा धोका; शेकडो एकर जमिनीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 12:32 IST

कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे डाव्या व उजव्या कालव्यातील पाण्याची सतत गळती होऊन धरण परिक्षेत्रातील जवळपास २० गावांतील कालवेग्रस्त भूमीपुत्रांची शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे.

निवास पाटीलसोळांकूर : महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल या उद्देशाने काळम्मावाडी धरणाची उभारणी केली गेली. वर्षानुवर्षे कोरड असणारी जमीन ओलिताखाली आल्याने बहुतांशी भाग सुजलाम् सुफलाम झाला आहे. पण या प्रकल्पाकडे सध्या दुर्लक्ष झाले आहे. कोणतेही विकासात्मक काम न होता हे धरण समस्यांच्या गराड्यात सापडले आहे.त्यापैकी कालव्यातील गळतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे डाव्या व उजव्या कालव्यातील पाण्याची सतत गळती होऊन धरण परिक्षेत्रातील जवळपास २० गावांतील कालवेग्रस्त भूमीपुत्रांची शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे.

काही एकर शेतात सततच्या पाण्यामुळे दलदल निर्माण होऊन पिकांच्या उत्पादनात घट होऊन उत्पादन निम्म्यावर आले आहे. शेतातील मशागती, खते यांचा विचार करता लाखोंचा फटका भूमिपुत्रांना सोसावा लागत आहे. जमिनीचे उत्पादन घटल्याने पीक कर्जासाठी काढलेले कर्जदेखील फेडताना भूमिपुत्रांना घाम फुटत आहे. आटेगाव पंडेवाडी या गावात राहत्या घरामध्ये पाण्याचे उमाळे फुटले आहेत. पोवारवाडी, आटेगाव, पंडेवाडी, मल्लेवाडी येथील काही घरांच्या पायातूनच पाण्याचे पाट वाहत आहेत.

तसेच काळम्मावाडी, लिंगाचीवाडी पनोरी, हेळेवाडी, पनोरी, मल्लेवाडी, मोघर्डे, सुळंबी, सोळांकुर, पंडेवाडी, ढेंगेवाडी, सावर्डेपाटणकर, पोवारवाडी, आटेगाव, उंदरवाडी, बुजवडे तसेच कालव्यालगत असणाऱ्या अनेक शेतामध्ये पाणी उमटून जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे, तर काही शेतात माठाचे अंश दिसत आहेत.

सन १९९३-९४ पासून काळम्मावाडी धरणाच्या मुख्य कालव्यातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आले. मुख्य कालवा कि.मी १ ते कि.मी. १० मध्ये सिमेंटचे अस्तरीकरण करण्यात आले होते. पण येथील जमीन विचित्र भूस्तराची असल्याने अनेक वेळा कालवा फुटीचे प्रकार घडलेले आहेत. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तेवढ्यापुरते पंचनामे झाले; पण नुकसानभरपाई मिळाली नाही. काही शेतकऱ्यांनी कालव्यालगतची जमीन कसणे सोडून दिले आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंती उभारूनदेखील लोकांच्या घरात पाण्याचे उमाळे फुटले आहेत.

कालवेग्रस्तांनी अनेक वेळा रस्ता रोको, आंदोलने व संघर्ष करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. पाण्याच्या गळतीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडणारा कोणी वाली भेटणार का ? अशी आर्त हाक भूमिपुत्र करत आहेत.

 २६ वर्षांपासून कालव्यांची डागडुजी नाही

गेली २६ वर्षे मुख्य कालव्यासह डाव्या व उजव्याची कोणत्याही प्रकारचे डागडुजी अथवा नवीन काम करण्यात आले नाही. नियोजित पोट कालवे अद्याप कागदावर आहेत. काही ठिकाणी कालव्यात झाडेझुडपे वाढली आहेत, तर कालव्यात दगड, खाचखळगे आहेत. प्रायोगिक तत्त्वावर जिओ सिंथेटिक अस्तरीकरणचा प्रयोग करण्यात आला होता. त्यालाही वाटण्याच्या अक्षदा लागल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर