शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाहू ब्लड बँकेकडून मानवतेचे कार्य  : राजेंद्र टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 19:04 IST

Blood Bank Rajesh TOpe Kolhapur :  राजर्षी शाहू ब्लड बँकेकडून गेली ४५ वर्षे मानवतेच्या कार्याचा महायज्ञ सुरू आहे असे गौरोद्गार राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काढले.

ठळक मुद्देशाहू ब्लड बँकेकडून मानवतेचा महायज्ञ : राजेश टोपे यांचे गौरवोद्गारशानदार सोहळ्यात नव्या वास्तूत स्थलांतर

कोल्हापूर : गेली ४५ वर्षे रक्तदानाच्या माध्यमातून राजर्षी शाहू ब्लड बँकेने मानवतेचा महायज्ञ सुरू ठेवला आहे, असे गौरवोद्गार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी येथे काढले.

येथील शाहू ब्लड बँकेच्या नूतन वास्तू स्थलांतर समारंभात ते बाेलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, या रक्तपेढीने काळानुरूप बदल केले. रुग्णांच्या गरजा ओळखल्या. नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले. व्यावसायिक पध्दतीचा अवलंब न करता सेवाभावी वृत्तीने त्यांनी हे काम केले हे या रक्तपेढीचे वेगळेपण आहे. संस्थेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी रक्तपिशवीचा आकार, खासगी रक्तपेढ्यांच्या किमतींवर नियंत्रण यासह अन्य ज्या काही सूचना केल्या आहेत. त्याचा निश्चितच विचार केला जाईल. संबंधित यंत्रणांशी बोलून याबाबत निर्णय घेतले जातील.रोटरी समाजसेवा केंद्राचे राजेंद्र देशिंगे यांनी आभार मानले. अमित माटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष गणपतराव पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उद्योजक व्ही. एन. देशपांडे, नितीन वाडीकर, प्रताप पुराणिक, राजीव परीख, राजू दोशी, साधना घाटगे, महेेंद्र परमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यांचा झाला सत्कार

यावेळी अधिकवेळा रक्तदान करणारे, इमारत उभारणारे आणि कंपन्यांमध्ये रक्तदान शिबिरे घेणारे राजू लिन्सवाला, वसंतराव चव्हाण, रवीद्र जाधव, मिथुन सात्रा, अभिजित बुधले, अभिजित कानेटकर, चिन्मय कागलकर, शैलेश देशपांडे, पाटीदार समाज, घाटगे पाटील उद्योग, मेनन पिस्टन, वसंतराव चौगुले पतसंस्था, इंद्रजित नागेशकर, हर्षद तांदळे, मनीष मिश्रा, अतुल इंगवले, यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेkolhapurकोल्हापूरBlood Bankरक्तपेढी