शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

लोकमतच्या महारक्तदान शिबिराला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 20:12 IST

Lokmat Blood Donetion Camp Kolhapur : नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं या लोकमतच्यावतीने आयोजित महारक्तदान शिबिराला, मानवतेच्या यज्ञाला शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. रक्तदानातून जीवनदान देण्याच्या या अभियानात दानशूर कोल्हापूरकरांनी सक्रिय सहभाग घेत पहिल्याच दिवशी कोरोनाच्या या कठीण काळात माणुसकीची ज्योत अखंड तेवत राहील याची प्रचिती दिली, तसेच यानिमित्ताने आमच्या हातून एक सत्कार्य घडले याचे समाधान व्यक्त करत ह्यलोकमतह्णच्या कार्याला मनापासून शुभेच्छा दिल्या.

ठळक मुद्देलोकमतच्या महारक्तदान शिबिराला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद १५ तारखेपर्यंत चालणार अभियान

कोल्हापूर : नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं या लोकमतच्यावतीने आयोजित महारक्तदान शिबिराला, मानवतेच्या यज्ञाला शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. रक्तदानातून जीवनदान देण्याच्या या अभियानात दानशूर कोल्हापूरकरांनी सक्रिय सहभाग घेत पहिल्याच दिवशी कोरोनाच्या या कठीण काळात माणुसकीची ज्योत अखंड तेवत राहील याची प्रचिती दिली, तसेच यानिमित्ताने आमच्या हातून एक सत्कार्य घडले याचे समाधान व्यक्त करत ह्यलोकमतह्णच्या कार्याला मनापासून शुभेच्छा दिल्या.लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराला व्यापक स्वरूप देत २ ते १५ जुलैदरम्यान जिल्ह्यात हे महारक्तदान शिबिराचे अभियान चालवले जाणार आहे. याचे उद्‌घाटन शुक्रवारी सकाळी नागाळा पार्क येथील शाडू ब्लड सेंटरमध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.यावेळी उद्योजक व ब्लड सेंटरचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, रोटरी समाज सेवा केंद्राचे राजेंद्र देशिंगे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष मेघराज चुग, सचिव केदार राठोड, ह्यलोकमतह्णचे संपादक वसंत भोसले, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, विक्रम चहाचे एरिया सेल्स मॅनेजर अभिजित देशमुख उपस्थित होते.यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या कठीण काळात रक्तदान हे मौल्यवान दान आहे, सध्या राज्यात सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा आहे. शासनाकडून वारंवार नागरिकांना रक्तदान करा, असे आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर घेतलेल्या रक्तदान शिबिर मोहिमेमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही चळवळ यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे आणि राज्यातून ५० हजारच नव्हे, तर १ लाख पिशव्या रक्ताचे संकलन व्हावे, अशा माझ्या शुभेच्छा आहेत.लोकमतचे संपादक वसंत भोसले म्हणाले, १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात २० हजार पिशव्या इतके कमी रक्त शिलल्क आहे. सध्याच्या अडचणीच्या काळात रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज आहे. ही गरज भागवण्यासाठी ह्यलोकमतह्णने पुढाकार घेतला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्हा, तालुके व गावागावांत ही मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन आम्ही करत आहोत.उद्‌घाटन सत्रानंतर दिवसभर रक्तदानासाठी नागरिकांची शाहू ब्लड सेंटरवर गर्दी होती. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांंनी रक्तदान करून या अभियानात सहभाग नोंदविला.पहिला दातारक्तदान शिबिराचे उद्‌घाटन होण्यापूर्वीच अनेक नागरिक रक्तदानासाठी आले होते. बांधकाम साहित्याचा व्यवसाय असलेले सोहेल जमादार हे या अभियानाचे पहिले रक्तदाते ठरले. मी ह्यलोकमतह्णचा नियमित वाचक आहे. गेली तीन-चार दिवस रक्तदानाच्या बातम्या वाचत होतो. चांगल्या कार्यात आपलेही योगदान असावे म्हणून मी रक्तदानासाठी पुढे आलो. लोकमतच्या या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.लग्नाचा वाढदिवस रक्तदानाने...येथील जाहिरात एजन्सीचे मालक मंदार व अनुजा तपकिरे यांच्या लग्नाचा शुक्रवारी पाचवा वाढदिवस होता. हा दिवस त्यांनी रक्तदानाने साजरा केला. ह्यलोकमतह्णने रक्तदान शिबिराची सुरुवात केली त्यावर्षीपासून मी या अभियानाशी जोडलो आहे. एकाने रक्तदान केल्याने तीन लोकांचा जीव वाचतो. कोरोनाच्या या परिस्थितीत सामाजिक कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही दोघांनीही रक्तदान केले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर