लसीकरणावेळी प्रचंड गर्दी, धक्काबुक्की अन‌् वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 07:03 PM2021-04-26T19:03:45+5:302021-04-26T19:06:31+5:30

Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे गर्भगळीत झालेल्या शहरवासीयांनी सोमवारी भर उन्हात महानगरपालिकेच्या सर्वच नागरी आरोग्य केंद्रांवर लस घेण्यासाठी तुफान गर्दी केली. काही केंद्रांवर वादावादी, धक्काबुक्की झाली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खूपच मनस्ताप झाला. लस राहिली दूर, रांगेतच कोरोनाची लागण व्हायची, असे चित्र सगळीकडे दिसले.

Huge crowds at the time of vaccination, pushback and debate | लसीकरणावेळी प्रचंड गर्दी, धक्काबुक्की अन‌् वादावादी

लसीकरणावेळी प्रचंड गर्दी, धक्काबुक्की अन‌् वादावादी

Next
ठळक मुद्देलसीकरणावेळी प्रचंड गर्दी, धक्काबुक्की अन‌् वादावादी नागरिकांसह कर्मचाऱ्यांची दमछाक : रांगेतच लागण होण्याची भीती

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे गर्भगळीत झालेल्या शहरवासीयांनी सोमवारी भर उन्हात महानगरपालिकेच्या सर्वच नागरी आरोग्य केंद्रांवर लस घेण्यासाठी तुफान गर्दी केली. काही केंद्रांवर वादावादी, धक्काबुक्की झाली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खूपच मनस्ताप झाला. लस राहिली दूर, रांगेतच कोरोनाची लागण व्हायची, असे चित्र सगळीकडे दिसले.

गेले दोन-तीन दिवस शहरातील नागरी केंद्रावरील कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन्ही लसी संपल्या होत्या. त्यामुळे लस मिळेपर्यंत सर्व लसीकरण केंद्रे बंद ठेवली होती. रविवारी कोव्हिशिल्डचे आठ हजार डोस मिळाले. महापालिका प्रशासनाने फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी लसीकरण सुरू ठेवण्यात येईल, असे जाहीर केले होते. तरीही पहिला डोस घेणाऱ्यांनीही केंद्राबाहेर गर्दी केल्याने गोंधळ उडाला.

शहरातील फिरंगाई रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय तसेच आयसोलेशन रुग्णालय येथे सोमवारी पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेनऊ वाजता तर अकरा लसीकरण केंद्रांवर तुफान गर्दी झाली. लोक रांगेत होते. लसीकरणाला सुरुवात झाली आणि पुढे जाण्यावरून वाद व्हायला लागले. माझा आधी नंबर यावा यासाठी प्रत्येक जण चढाओढ करत राहिले. परिणामी गोंधळ उडाला.


 

Web Title: Huge crowds at the time of vaccination, pushback and debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.