शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गणेश दर्शनासाठी नागरिकांची अलोट गर्दी, पावसाने उसंत दिल्याने उत्साह ओसंडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:47 IST

दुचाकीवरूनच दर्शन घेणाऱ्यांमुळे गर्दी

कोल्हापूर : शहर, उपनगर, पेठा, कसबा बावडा येथे बुधवारी गणेश दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत अलोट गर्दी झाली होती. अनेकजण कुटुंबांतील सर्व सदस्यांसह, मित्रमंडळींसह गणपती, देखावे दर्शनाचा आनंद घेतला. यामुळे शहरातील सर्वच रस्ते उशिरापर्यंत गजबजून गेले होते. देखाव्याच्या जवळपास खाद्यांचे स्टॉलही फुल्ल होते. गणेश दर्शनानंतर आलेले अनेकजण या स्टॉलवर ताव मारताना दिसत होते.घरगुती गणेश विसर्जनानंतर शहरातील सार्वजनिक गणपती, देखावा पाहण्यासाठी बहुतांशी जण बाहेर पडले. सायंकाळनंतर देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली तसा कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. गणेश दर्शन सुरळीतपणे पार पडावे यासाठी मंडळाचे कार्यकर्ते स्वयंसेवकाच्या भूमिकेत वावरत होते. गर्दीवर नियंत्रण, देखावे पाहण्यासाठी रांगा लावणे, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेकांनी पोलिस मित्राची भूमिका बजावली. रात्री आठ वाजल्या पासूनच शहरातील प्रमुख रस्ते गर्दीने फुलू लागले. दुचाकी, चारचाकी, रिक्षा, टेम्पोने लोक गणेश दर्शनासाठी येत राहिले.कसबा बावडा, शिवाजी पेठ, शुक्रवारपेठ, मंगळवारपेठ, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी यासह विविध पेठा, कसबा बावडा, लाईन बझार, संभाजीनगर येथे दर्शनासाठी संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर दिसत होते. श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या गणेश दर्शनासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या. आकर्षक विद्युत रोषणाई आणि लक्षवेधी देखावे असलेल्या मंडळासमोर आबालवृद्धांची संख्या अधिक दिसत होती. अधिक गर्दी असेल्या ठिकाणी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांना गटागटाने दर्शनासाठी सोडत होते. जिवंत आणि तांत्रिक देखावे असलेल्या ठिकाणी दर्शनासाठी लांबच्या लांब रांग लागत होती. महिला, पुरुषांची रांग वेगळी होती.दुचाकीवरूनच दर्शन घेणाऱ्यांमुळेगणेश मंडपासमोर दुचाकी आणायची आणि खाली न उतरता त्यावर बसूनच देखावे पाहायचे, असे करणाऱ्या दुचाकीस्वारामुळे गर्दीत भरच पडत राहिली. गर्दीतून लहान मुलांना दर्शन घेणे अडचणीचे ठरत होते.

सजीव देखाव्यांनी खेचली गर्दी, ऐतिहासिक देखाव्यांतून प्रबोधनाची वाटस्थानिक आणि हौशी कलाकारांचा सहभाग आणि उपस्थितांचा त्याला मिळणारा भरभरून प्रतिसाद अशा वातावरणात बुधवारी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळाचे सजीव देखावे खुले झाले. ऐतिहासिक देखाव्यांनी नागरिकांची गर्दी खेचली आहे. या देखाव्यातून प्रबोधनासह रोमांच उभा करणारा इतिहास अनेकांनी अनुभवला.रंकाळा टॉवर येथील कै. उमेश कांदेकर युवा मंचने स्वराज्य रक्षक रणरागिणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त ‘ऐतिहासिक कुंकू’ हा देखावा सादर केला. हा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. कपिलतीर्थ मार्केटमधील मित्रप्रेम मंडळाचा ‘शिवछत्रपतींच्या गडकोट-किल्ले संवर्धनावर’ आधारित सजीव देखावा खुला झाला. खरी कॉर्नर शिवाजी पेठ येथील अवचितपीर तालीम मंडळाचा ‘आग्रा दरबाराला शिवछत्रपतींची भेट’ हा देखावा पाहण्यासाठी गर्दी झाली. निवृत्ती चौकातील गोल्डस्टार स्पोर्टस् असोसिएशनचा सरसेनापती नेताजी पालकर या देखाव्याने नागरिकांची गर्दी खेचली.कसबा बावडा ठोंबरे गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळातर्फे ‘शाहिस्तेखानाची फजिती’, राजारामपुरी पाचवी गल्ली येथील विवेकानंद मित्र मंडळातर्फे ‘सरसेनापती’ देखावा आकर्षण ठरत आहे. लेटेस्ट तरुण मंडळाचा ‘साईची लीला श्रद्धा आणि सबुरी’ या देखाव्याने गर्दी खेचली.बुधवार पेठेत आकर्षक गणेशमूर्ती आणि वैविध्यपूर्ण विषयांवर देखावे हे उत्सवाचे आकर्षण ठरत आहे. प्राचीन मंदिराच्या प्रतिकृती, कलात्मक गणेशमूर्ती, गुहेतील शिल्पाकृती यंदाच्या उत्सवाचे वेगळेपण दर्शवित आहेत. शहरातील बहुतांश सार्वजनिक तरुण मंडळांनी आपले देखावे बुधवारपासून खुले केले. देखावे खुले करण्यासाठी दिवसभर कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती.मनोरंजनातून प्रबोधनशिवाजी पेठ, मंगळवार पेठेत सजीव देखाव्यांची मोठी परंपरा आहे. याठिकाणी मनोरंजनातून सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या नाटिका सादर केल्या जातात. शिवकालीन प्रसंगांवर आधारित सजीव देखावे, शहरातील कचरा, पाणी, रस्ते याकडे लक्ष वेधणारे सजीव देखावे नागरिकांसाठी वेगळी पर्वणी ठरत आहेत.