शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

महापौर माळवींचा राजीनामा मी कसा घेणार : राजू जाधव

By admin | Updated: February 15, 2015 01:04 IST

जबाबदारी पक्षाची : राष्ट्रवादीच्या नेत्यांना न भेटल्याचा दावा

कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. त्यांचा राजीनामा मी कसा घेणार, अशी विचारणा येथील पॉप्युलर स्टील वर्क्सचे राजू जाधव यांनी शनिवारी केली. दिवसभरात राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्यांना मी भेटलेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महापौर माळवी यांच्या राजीनामा प्रकरणास वेगळेच वळण लागले असून, सोमवारी त्या राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर तृप्ती माळवी यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी पॉप्युलर स्टील वर्क्सचे संचालक व उद्योजक राजू जाधव यांच्यावर शनिवारी सोपवली. श्री.जाधव हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. आमदार हसन मुश्रीफ, आर. के. पोवार व राजू लाटकर या तिघांनी राजू जाधव यांच्या प्रतिभानगरातील निवासस्थानी दुपारी साडेतीन वाजता जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. महापौरपदी निवड व्हावी म्हणून राजू जाधव यांनी माळवी यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यामुळे राजीनामा घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे व ती त्यांनी स्विकारली असून आज, रविवारीच ते माळवीं यांच्याशी संपर्क साधतील अशी माहिती आर. के. पोवार यांनी सायंकाळी पत्रकारांना दिली. या नेत्यांत नेमकी काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ ने उद्योजक राजू जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरची कथित भेटच झाली नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘जपान मधील एका मोठ्या उद्योग समुहाचे एक शिष्टमंडळ उद्योग विस्तारासंबंधीची चर्चा करण्यासाठी कोल्हापुरात आले आहे. त्यामुळे दिवसभर मी त्यांच्यासमवेतच होतो. याकाळात मला कुणाचा मोबाईलही घेता आलेला नाही. आज, रविवारीही मला त्यांना घेवून बेळगावला जायचे आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभरात मी कुणाशी भेटलेलो नाही. दुसरे असे की मी माळवी यांना महापौर करा अशी विनंती केली असली तरी ते पद देण्याचा निर्णय पक्षाचा होता. त्यामुळे त्यांचा राजीनामा पक्षानेच घ्यावा. मी त्यामध्ये कांहीच हस्तक्षेप करु इच्छित नाही व करणारही नाही.’ महापौरांचा राजीनामा घेतला, महापौर राजीनामा देणार, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना आणि ज्यांच्या गटाचे नवे महापौर होणार, अशा कॉँग्रेसच्या नेत्यांना महापौर माळवी यांनी अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा ठेंगा दाखविला. सोमवारच्या महापालिकेच्या सभेत राजीनामा देण्याचे ठरल्यानंतर सभेचा अजेंडा प्रसिद्ध झाला; पण या सभेदिवशीच महापौरांनी रजा घेतल्यामुळे राजीनामा न देण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला आहे. दरम्यान, राजीनामा देण्यासाठी महापौरांवर शनिवारी दिवसभर दबाब आणण्यात येत होता; परंतु ‘स्विच आॅफ’ असलेल्या माळवी यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही.