शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

स्वच्छ कारभाराच्या गप्पा मारता, मग ‘ब’ वर्ग कसा?

By admin | Updated: April 17, 2015 00:09 IST

संजय पाटील यांची सत्तारूढांना विचारणा : पारदर्शकतेचा बुरखा फाटल्याने परिवर्तन अटळ

राजाराम लोंढे -कोल्हापूर -गेल्या अकरा वर्षांत आदर्श कारभार केल्याचा डांगोरा पिटणाऱ्यांनी पतसंस्थेच्या लेखापरीक्षण अहवालावर बोलावे. पतसंस्थेचा ‘सीडी’ रेशो ११५ टक्के, गुंतवणुकीवर कर्ज उचलून पतसंस्थेला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम सत्तारूढ गटाने केले आहे. स्वच्छ कारभाराच्या गप्पा मारता मग पतसंस्थेचा आॅडिट वर्ग सलग ‘ब’ कसा? अशी विचारणा पतसंस्थेचे माजी सभापती व राजर्षी शाहू परिवर्तन महाआघाडीचे नेते संजय डी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. संजय पाटील म्हणाले, पतसंस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात गंभीर शेरे मारले आहेत. १९५ कोटींच्या ठेवींवर किमान ५५ कोटी गुंतवणूक गरजेची होती, पण या मंडळींनी २८ कोटी गुंतवणूक केली तीही तारण देऊन कॅश क्रेडिट उचलले आहे. ठेवी व कर्जाचे गुणोत्तर प्रमाण ११५ टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी भयानक अवस्था पतसंस्थेची केल्यानेच लेखापरीक्षण अहवालात ताशेरे ओढले आहेत. रिकरिंग व शेअर्स ठेव कमी व्याजाने घेऊन ती सभासदांनाच १२.५ टक्क्यांनी दिली जाते, वर्षाला पाच कोटी रुपये सभासदांचे नुकसान होते, हीच दादा लाड यांची पारदर्शकता काय? शेजारील जिल्ह्णातील माध्यमिक शिक्षकांच्या पतसंस्थेचा कारभार पाहिला तर सत्तारूढ मंडळींची धूळफेक लक्षात येते. ५५ लाख रुपये खर्च करूनही सर्व शाखांत संगणकीकरण पूर्ण झालेले नाही. संघटनांच्या नेत्यांनी नोकरभरती केल्याची टीका दादा लाड करत आहेत, पण यांनी काय केले. साडेआठ हजार सभासदांना सव्वा कोटी लाभांश आणि ५४ कर्मचाऱ्यांचा दीड कोटी पगार होत असल्याने नोकरभरतीऐवजी कर्जाचा व्याजदर १२ टक्के करावा, अशी मागणी आमची होती पण लाड यांनी बहुमताच्या जोरावर भरतीचा घाट घातला, त्याविरोधात न्यायालयीन लढाई केली, चुकीची माहिती देऊन न्यायालयाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही सबळ पुरावे दिल्याने स्थगिती मिळाली. अशा मंडळींना संघटनेच्या भरतीवर बोलण्याचा नैतिक अधिकार काय? या प्रश्नांची जाहीर सभांमधून विचारणा करूनही दादांची बोलती बंद का ? असा खडा सवालही पाटील यांनी केला. महाआघाडीला खिचडी म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, आम्हाला सत्तेची हाव कधीच नव्हती आणि नाही, पण आठ हजार सभासदांची संस्था वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाऱ्यांची बुरखा फाटला असून सूज्ञ सभासदांनी अशा प्रवृत्तीला बाजूला करण्याचे ठरविल्याने परिवर्तन अटळ असल्याचेही त्यांनी सांगितले.