शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बहीणींचा लाभ घेणारे भाऊ किती?, गुपीतच!; कोल्हापूर जिल्हा महिला बाल विभागाकडे नाही आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:03 IST

थेट मंत्रालयातून कार्यवाही

कोल्हापूर : वाहत्या पाण्यात हात धुऊन घेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १४ हजार पुरुषांपैकी जिल्ह्यातील पुरुष किती ही संख्या अजून जिल्हा महिला व बाल विभागाला कळालेली नाही. लाडकी बहीण योजनेचे पोर्टल राज्य शासनाच्या पातळीवर चालवले जात असून, त्याची कोणतीही आकडेवारी जिल्ह्यांना पाठवली जात नाही. त्यामुळे या योजनेच्या पुरुष लाभार्थींपासून बोगस लाभार्थी, सरकारी कर्मचारी महिला, अन्य योजनांचा लाभ घेऊनही लाडकी बहीणचा लाभ घेत असलेल्या महिला यापैकी एकाचीही आकडेवारी या विभागाकडे नाही.राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या लाडकी बहीण योजनेच्या वाहत्या गंगेत पुरुषांनीही हात धुऊन घेतल्याचे समाेर आले आहे. ‘लोकमत’कडील आकडेवारीनुसार, १४ हजार २९८ पुरुषांच्या खात्यावर ही रक्कम गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर महिला व बाल कल्याण विभागाने कार्यवाही सुरू केली असून, मंत्री आदिती तटकरे यांनी या आकडेवारीची शहानिशा केली जाईल, असे जाहीर केले आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील किती पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला याची आकडेवारी जाणून घेण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला. मात्र, जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाकडे ही आकडेवारी उपलब्ध नाही.

जिल्ह्यांकडे आकडेवारी का नाही?लाडकी बहीण योजनेसंबंधीची कोणतीच माहिती जिल्ह्याकडील विभागांकडे नाही. थेट मंत्रालयातून चाळण लावली जाते. तेथूनच महिला सरकारी कर्मचारी आहेत का, अन्य योजनेचा लाभ घेतात का, बोगस अर्ज भरलेत का, चारचाकी-उत्पन्न या निकषात बसतात का या सगळ्या तपासणीची कार्यवाही मंत्रालय पातळीवर केली जात आहे. तसे लाभार्थी आढळले की त्यांचे लाभ बंद केले जात आहेत. पण, जिल्हा कार्यालयाकडे स्थानिक पातळीवर कोणतीच माहिती का उपलब्ध नाही, याचे उत्तर मात्र सरकारी यंत्रणेकडे नाही.

फक्त तक्रारींची नोंदलाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला की महिला जिल्हा महिला व बाल विभागाकडे तक्रार करण्यासाठी येतात तेंव्हाच विभागाला त्यांचा लाभ बंद झाल्याचे कळते. त्यानंतर ते महिलेचा अर्ज, आधार व अन्य संबंधित कागदपत्रे तपासून त्यांचे कारण सांगतात. कार्यालयाकडे अशा तक्रारींचे चार-पाच रजिस्टर भरले आहेत.