शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

आता अमित शहा यांच्याजवळ कसे बसता ? -: चंद्रकांत जाधव यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:11 IST

महाराष्टवर अफझलखानाची फौज चालून येत असल्याची टीका करून त्याला मातीत गाडा, असे आवाहन गेल्या विधानसभा निवडणुकीत करण्यात आले होते. पाच वर्षांपूर्वी अफजलखान वाटणाऱ्या अमित शहा यांच्या कोल्हापुरातील सभेत शिवसेनेचे आमदार मांडीला मांडी लावून बसतात. त्यांचे खरे मुखवटे जनतेने आता ओळखले आहेत.

ठळक मुद्देचंद्रकांत जाधव रोखठोक- मी उपद्रवशून्य माणूस; जनतेने विरोधकांचे खरे मुखवटे ओळखले आहेत

भारत चव्हाण ।कोल्हापूर : ‘पाच वर्षांपूर्वी ज्या अमित शहा यांची अवहेलना तुम्ही अफझलखान म्हणून केली. त्याच शहा यांच्याशेजारी आता कसे बसता,’ असा सवाल सोमवारी ‘कोल्हापूर उत्तर’मधील काँग्रेस आघाडीचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी उपस्थित केला. ‘मी उपद्रवशून्य माणूस आहे, माझा कोणाला त्रास होणार नाही, झालीच तर मदत होईल’, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

जाधव यांनी ‘लोकमत’ला मुलाखत देताना शहरातील आमदारांवर प्रथमच टीकास्त्र सोडले. गेल्या पाच वर्षांत तुम्ही कुठे होता, असा सवाल विरोधक करीत आहेत याकडे लक्ष वेधले असता जाधव म्हणाले की, ‘मी कुठे होतो हे विरोधकांना दिसत नसले तर त्यात माझा नाईलाज आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने मी जनतेबरोबर राहिलो आहे. महापुराच्या काळात पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्याच्या प्रयत्नांत होतो. वैद्यकीय शिबिरे घेतली आहेत. खेळाच्या मैदानावर आहे. सामाजिक कार्यातसुद्धा आघाडीवर आहे आणि त्याची माहिती जनतेला आहे’.‘आतापर्यंतच्या सामाजिक व राजकीय जीवनात माझा कोणाला त्रास झाला नाही. खंडणी मागणे, दहशत निर्माण करणे या गोष्टी तर माझ्या रक्तातही आणि स्वभावातही नाही. जनतेला माझा उपद्रव होईल, असे कधीच वागलो नाही. झालीच तर मदत होईल. निवडणुकीत लोक नेहमी तुलना करत असतात म्हणूनच मला विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘कार टू कारपेट नेता’ अशी टीका तुमच्यावर केली जात असल्याबद्दल विचारता जाधव यांनी सांगितले की, ‘त्यांनी काय म्हणावे हा त्यांचा प्रश्न आहे. मी कारपेटवर चालतो, फ्लोअरवर चालतो की रस्त्यावर चालतो हे जनतेला ठाऊक आहे. झोपडपट्टीपासून ते महालापर्यंत माझी ऊठबस आहे. कुठेही जाऊ शकतो. कुठेही बसू शकतो. कारण मी एक स्वच्छ प्रतिमेचा सर्वांबद्दल प्रेम असणारा, आदर बाळगणारा माणूस आहे. त्यामुळे ‘कार टू कारपेट’ अशी होणारी टीका निरर्थक आहे. आज मला जो वाढता पाठिंबा मिळतो आहे तेच या टीकेला चोख उत्तर आहे’.तुम्ही भाजपमधून एकदम काँग्रेसमध्ये गेला आणि उमेदवारी मिळविली, त्यामुळे मूळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी तुम्हाला स्वीकारले आहे का? अशी विचारणा केली असता जाधव यांनी सांगितले की, ‘प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार पाहिजे असतो.

कार्यकर्त्यांनाही त्याची जाणीव असते. त्या उमेदवाराची प्रतिमा, त्याचा चेहरा, वर्तणूक, उपयोगीता, कामाची तळमळ याचा परिणाम मतात रूपांतर करण्यासाठी होतो. मला काँग्रेसची उमेदवारी मिळाली आणि काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्टÑवादीसह आघाडीतील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. कार्यकर्ते आणि जनताच मला विजयापर्यंत घेऊन जात आहे’.दहा वर्षे शहर मागे पडलेशहराचा विकास ज्या पद्धतीने व्हायला हवा होता तो झाल्याचे दिसत नाही. पर्यटन, उद्योग आणि आयटी क्षेत्रात काम करण्याची येथे संधी आहे. गेल्या दहा वर्षांत आपले शहर बरेच मागे पडले. या क्षेत्रात शहराला पुढे नेण्यात संधी असतानाही बरीच निष्क्रियता दिसून आली. येथे पायाभूत सुविधा देण्यापासून अनेक अडचणी आहेत. त्यामुळे जनतेने ही निष्क्रियता ओळखली आहे. लोक प्रतिनिधी हा ट्रस्टी असतो. त्याने शाश्वत विकासाच्या भूमिकेतून काम केले पाहिजे, ही माझी भूमिका आहे, असे जाधव म्हणाले.शहरात झालेल्या टोल, एलबीटीविरोधी आंदोलनात मी सक्रिय होतो. जीएसटीसंदर्भातील आंदोलनात होतो. वीज दरवाढीविरोधातील आंदोलनात होतो आणि याची सर्वाना माहिती आहे. 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसVidhan Parishadविधान परिषद