शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ भाजपमध्ये असताना कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडे मते मागणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 11:10 IST

भाऊ भाजपमध्ये असताना कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे कशी मते मागू शकता? असा टोला आमदार सतेज पाटील यांनी नाव न घेता खासदार धनंजय महाडिक यांना लगावला. तसेच गेल्या पाच वर्षांत भाजपला मदत करून कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसला संपविण्याचेच काम त्यांनी केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ठळक मुद्देसतेज पाटील यांचा धनंजय महाडिक यांना टोला  पाच वर्षांत कॉँग्रेस-राष्ट्रवादी संपविण्याचेच काम

कोल्हापूर : भाऊ भाजपमध्ये असताना कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे कशी मते मागू शकता? असा टोला आमदार सतेज पाटील यांनी नाव न घेता खासदार धनंजय महाडिक यांना लगावला. तसेच गेल्या पाच वर्षांत भाजपला मदत करून कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसला संपविण्याचेच काम त्यांनी केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात  पाटील पत्रकारांशी बोलत होते. जो-तो आपल्या पक्षाचा प्रचार करत आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडीबाबत काय निर्णय होतोय याची आपल्याला कल्पना नाही. तसेच आघाडीकडून कोण उमेदवार हेही निश्चित झालेले नाही.राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणविणाऱ्यांनी अजून राष्ट्रवादीचे घड्याळ व कॉँग्रेसचे चिन्ह लावलेले नाही; त्यामुळे सर्व संभ्रमावस्थेत आहेत. जोपर्यंत उमेदवारीची अधिकृतरीत्या घोषणा होत नाही, तोपर्यंत अधिक बोलणे उचित होणार नाही, असे आ. पाटील यांनी सांगितले.भाऊ भाजपमध्ये असताना निवडणुकीत राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार म्हणून कॉँग्रेस व राष्ट्रवादीकडे कशी मते मागू शकतात, असा टोला आ. पाटील यांनी खा. महाडिक यांचे नाव न घेता लगावला. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत भाजपला मदत करून कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस हे पक्ष कसे संपतील अशीच भूमिका महाडिक यांनी घेतली आहे.

हे सर्व कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावरही घातल्या असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. उमेदवारीबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नसल्याने यावर आताच बोलणे उचित होणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूर