गडहिंग्लज : पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घराची चावी व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरी होत्या. यावेळी घरकुल पूर्ण झालेल्या १० लाभार्थ्यांना घराची चावी तर स्लॅब लेव्हल बांधकाम पूर्ण झालेल्या १७ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.पालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.कोरी म्हणाल्या,स्वत:चे घर असावे असे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते.त्याच्या पूर्ततेसाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी पालिकेला मिळाली,याचा आनंद झाला. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर म्हणाले,राज्य शासनाचे २९लाख व केंद्राचे १६ लाख २० हजार मिळून ४५ लाख २० हजार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.कार्यक्रमास उपनगराध्यक्ष महेश कोरी बांधकाम सभापती नरेंद्र मलकापूर नगर अभियंता सुजित पोद्दार लेखापाल शशिकांत मोहिते उपस्थित होते.आवास योजना प्रमुख प्रमोद फराकटे यांनी आभार मानले.
गडहिंग्लज नगरपालिकेकडून आवास लाभार्थ्यांना घराची चावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:03 IST
Pradhan Mantri Awas Yojana kolhapurnews- पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घराची चावी व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरी होत्या. यावेळी घरकुल पूर्ण झालेल्या १० लाभार्थ्यांना घराची चावी तर स्लॅब लेव्हल बांधकाम पूर्ण झालेल्या १७ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.पालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.
गडहिंग्लज नगरपालिकेकडून आवास लाभार्थ्यांना घराची चावी
ठळक मुद्देगडहिंग्लज नगरपालिकेकडून आवास लाभार्थ्यांना घराची चावी