शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाचे स्वागत जल्लोषात, हॉटेल्स रात्री बारापर्यंत सुरु राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 11:43 IST

जिल्ह्यातील जमावबंदी आणि ओमायक्रॉनबाबतच्या निर्बंधामुळे नववर्षाच्या स्वागतावर मर्यादा आल्या आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करत कोल्हापूरकरांनी थर्टी फर्स्टच्या पार्टीचे नियोजन केले आहे.

कोल्हापूर : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात नियम आणि निर्बंधांचे पालन करत आज, शुक्रवारी सरत्या वर्षाला निरोप, तर नववर्षाचे स्वागत होणार आहे. शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल खवय्यांसाठी रात्री बारापर्यंत सुरु राहणार आहेत. त्यादृष्टीने हॉटेल व्यावसायिकांनी तयारी केली आहे.जिल्ह्यातील जमावबंदी आणि ओमायक्रॉनबाबतच्या निर्बंधामुळे नववर्षाच्या स्वागतावर मर्यादा आल्या आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करत कोल्हापूरकरांनी थर्टी फर्स्टच्या पार्टीचे नियोजन केले आहे. आपल्या बजेट आणि सोयीस्कर ठरणाऱ्या हॉटेलमध्ये टेबलची नोंदणी अनेकांनी केली आहे. आपल्या अथवा मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांच्या घरी काहींनी मर्यादित सदस्यांच्या उपस्थितीमध्ये पार्टीची तयारी केली आहे. हॉटेल व्यावसायिकांनी ५० टक्के क्षमतेने बैठक व्यवस्था, एक आड एक टेबलची रचना केली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार पार्सल सुविधा पुरविण्याची तयारी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. हॉटेलमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, रात्रीची जमावबंदी असल्याने अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी खुल्या मैदानातील पार्टीचे नियोजन रद्द केले आहे. 

जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाच्या नियमांचे पालन करून शुक्रवारी रात्री बारापर्यंत कोल्हापुरातील हॉटेल सुरू राहणार आहेत. त्यादृष्टीने आम्ही सर्व व्यावसायिकांनी तयारी केली आहे. निर्बंध आणि नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करणार आहोत.-आनंद माने, संचालक, कोल्हापूर हॉटेल मालक संघ 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर31st December party31 डिसेंबर पार्टीNew Yearनववर्षhotelहॉटेल