शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य योजनेची २५० कोटींहून अधिक रुपयांची बिले थकीत, रुग्णांना लाभ मिळेना; उद्धवसेनेचा आरोप

By पोपट केशव पवार | Updated: April 5, 2025 18:52 IST

रुग्णालयांची बिले द्या अन्यथा राज्यभर आंदोलन

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेचा लाभ दिलेल्या रुग्णालयांची २५० कोटींहून अधिक रुपयांची बिले थकल्याने सर्वसामान्य रुग्णांना लाभ मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे सरकारने या रुग्णालयांची बिले त्वरित अदा करावीत अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व शहरप्रमुख सुनील मोदी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.पवार व मोदी म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहीण योजना सुरू केली, ही योजना सुरू करताना कोणतेही आर्थिक नियोजन केले नाही. याचा परिणाम आज विविध योजनांवर पडत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान आयुष्मान भारत योजना सुरू आहेत. मात्र, सध्या या योजना बंद पडतील अशी स्थिती आहे. या दोन्ही योजनांचा लाभ दिलेल्या रुग्णालयांची बिले थकली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना लाभ मिळणे अवघड झाले आहे. या रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत रुग्ण घेणेच बंद केले आहे. परिणामी आरोग्यसेवेवर परिणाम होऊन जनतेच्या खिशातील पैसे आरोग्यावर खर्च होत आहेत. त्यामुळे सरकारने ही बिले त्वरित अदा करावीत अन्यथा राज्यभर आंदोलन उभा करू, असा इशारा पवार व मोदी यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाGovernmentसरकार