शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा विभागाचे वरातीमागून घोडे, बंद केलेल्या ‘बिग बझार’वर सीलची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:18 IST

उद्यमनगर येथील बिग बझार शुक्रवारी महापालिकेच्या घरफाळा विभागाने सील केला. दोन कोटी ५६ लाखांचा घरफाळा थकीत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, बिग बझार यापूर्वीच नूतनीकरणाच्या नावाखाली बंद केला आहे. दोन कोटींची थकबाकी असताना महापालिकेने इतके दिवस कारवाई करण्यास विलंब का लावला, असा सवालही उपस्थित होत आहे. तसेच घरफाळा विभागाचे काम म्हणजे वरातीमागून घोडे अशीही चर्चा महापालिकेत सुरू आहे.

ठळक मुद्दे घरफाळा विभागाचे वरातीमागून घोडे, बंद केलेल्या ‘बिग बझार’वर सीलची कारवाई कारवाई दिरंगाईवरून उलट-सुलट चर्चा

कोल्हापूर : उद्यमनगर येथील बिग बझार शुक्रवारी महापालिकेच्या घरफाळा विभागाने सील केला. दोन कोटी ५६ लाखांचा घरफाळा थकीत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, बिग बझार यापूर्वीच नूतनीकरणाच्या नावाखाली बंद केला आहे. दोन कोटींची थकबाकी असताना महापालिकेने इतके दिवस कारवाई करण्यास विलंब का लावला, असा सवालही उपस्थित होत आहे. तसेच घरफाळा विभागाचे काम म्हणजे वरातीमागून घोडे अशीही चर्चा महापालिकेत सुरू आहे.महापालिकेच्या विविध विभागांच्या वसुलीमध्ये तूट आली आहे. दिलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. यानुसार सर्व विभागांनी थकीत वसुलीचा धडका लावला आहे. यामध्ये घरफाळा विभागानेही थकीत घरफाळा असणाऱ्या मिळकती सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी बिग बझार घरफाळा थकबाकीप्रकरणी सील केला.जागामालकाने सांगितल्यानंतर महापालिकेला आली जागघरफाळा थकबाकी असलेल्या मिळकतींनी कराची रक्कम जमा करावी, अन्यथा मिळकत सील करून त्यांच्यावर बोजा नोंद करण्यात येईल, अशा नोटिसा मागील आठवड्यामध्ये थकीत मिळकतींना पोस्टाने दिल्या आहेत. अशाच प्रकारे सुधारित कराची थकबाकी रक्कम जमा करावी म्हणून बिग बझार यांना ही नोटीस दिलेली होती. त्यांनी कराची रक्कम जमा न करता इतरत्र व्यवसाय स्थलांतरित करण्याची व्यवस्था सुरू केली. मिळकत मालक यांनी महापालिकेस लेखी पत्र देऊन कराची रक्कम वसूल करावी, असे कळविले. यानंतर घरफाळा विभाग खडबडून जागा झाला आणि त्यांनी सीलची कारवाई केली.साहित्य स्थलांतर केल्यानंतर कारवाईबिग बझार अचानक बंद करण्यात आला आहे. यानंतर शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. बझारच्या बाहेर नूतनीकरणामुळे बझार बंद असल्याचा फलक लावला आहे. तो दुसरीकडे स्थलांतरित करणार असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, बाजार व्यवस्थापनाने येथील बहुतांश साहित्य स्थलांतरित केले आहे. महापालिकेने साहित्यासह मिळकत सील केली असल्याचा दावा केला आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर