शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जगण्याची उमेद - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:27 AM

मानवी स्वभावगुणदोषानुसार संकट जोपर्यंत आपला मार्ग अडवत नाही तोपर्यंत आपण आपल्या सुखांच्या मागे धावत सुटतो. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती ...

मानवी स्वभावगुणदोषानुसार संकट जोपर्यंत आपला मार्ग अडवत नाही तोपर्यंत आपण आपल्या सुखांच्या मागे धावत सुटतो. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती झाली होती जेव्हा कोरोनाचा विषाणू दूर कुठेतरी वुहान प्रांतात धुमाकूळ घालत होता. तो जोपर्यंत आपल्या गावाच्या वेशीबाहेर आला नव्हता, तोपर्यंत सगळं आलबेल होतं; आणि मग एक दिवस अचानक लाॅकडाऊन, संस्थात्मक विलगीकरण, ऑक्सिजन पुरवठा, औषध, वैद्यकीय व्यवस्था, पीपीई किट यांसाठी धावाधाव सुरू झाली; पण यावेळी माणसाच्या लढाऊवृत्तीचा पुन:प्रत्यय आला. संपूर्ण मानवसमाज एक होऊन या जागतिक प्रलयंकारी संकटाशी लढताना दिसला. प्रत्येकजण आपापल्या परीने पर्याय शोधू लागला. जगण्यासाठी धडपडणाऱ्या गोरगरीब, असाहाय्य जनतेच्या मदतीला लोक उभे राहू लागले. स्थलांतरित होणाऱ्यांना कोणी खायला दिले, कोणी पाणी दिलं, कोणी जमेल तेवढी वाहतूक व्यवस्था केली. कोरोनाच्या साथीत हार न मानता कोणी घरात बसून, कोणी रस्त्यावर उतरून सरकारकडून येणाऱ्या आदेशांचे पालन केले. पहिल्यांदा पंधरा दिवसांसाठी सुरू केलेला लाॅकडाऊन वाढत गेला. दिलेल्या सूचना पाळून लोकांनी घरी शांत बसणे पसंत केले; पण कोरोनाचा प्रभाव काही कमी होताना दिसत नव्हता. फैलाव वाढत गेला तसा लाॅकडाऊन वाढत गेला. दूरवर शहरात उदरनिर्वाहासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांनी गावी जाणे सुरू केले. या स्थलांतरात काही दुर्घटना घडल्या तशी समाजातील मोठ्या मनाच्या लोकांनी आपली झोळी रिकामी करायला सुरुवात केली. काही विक्षिप्त लोकांनी कमरेला अमरत्वाचा पट्टा बांधून जणू आपण अनादिकाळापर्यंत जगणार आहोत, या अविर्भावात लुटालूट सुरू केली. मिळेल त्या मार्गाने कमाई केली तरी लोकांनी जगण्याचा संघर्ष थांबवला नाही.

एखादी अवघड चढण चढून डोंगरमाथ्यावर आल्यावर आपल्याला आपले उद्दिष्ट साध्य होईल, या आशेवर घसा सुकला, हातपाय थकले, अंगातील त्राण संपले तरी डोंगर चढून वर आलो आणि समोर खोल दरी दिसावी. त्याच्या पलीकडे जंगल आणि त्यांच्या पलीकडे पुसटशी कल्पना येईल, अशा पद्धतीने आपले ध्येय दिसले. आता उडी मारून कडेलोट करून जीवनयात्रा संपवायची नाही. कडेकपारीतून सरपटत खाली उतरावे. किती ओरखडले, कितीही दमलो, थकलो, कितीही असह्य झाले तरी हार न मानता मिळेल त्या मार्गाने पुढे जात राहावं. उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून मार्गाक्रमण करीत राहावे. थांबावे, विचार करावा, विसावा घेऊन पुन्हा चालत राहावं ही जगण्याची उमेद आपल्याला कोरोनाच्या जंगलातून बाहेर घेऊन येत असताना दिसत आहे. या कठीण काळात काही चुका झाल्या. काही लोक चुकीचे वागले; पण मानवी गुणवैशिष्ट्यांनुसार चांगले ते धरावे. वाईट ते सोडून द्यावे. एकमेकांच्या जखमांवर फुंकर घालत पुढे सरकत राहावं.

कोरोनाच्या काळात अनेक जणांची आर्थिक घडी विस्कळीत झाली. सगळ्यात पहिला फटका बसला शेतकरी आणि पोल्ट्रीमालक यांना. अचानक सगळे ठप्प झाले; त्यामुळे शेतमाल तोडणी, वाहतूक आणि वितरण थांबले. भाजीपाला अक्षरशः शेतात सडून गेला. कोणीतरी आवई उठवली की, कोरोना चिकन खाल्ल्याने होतो. क्षणात चिकनचे दर कवडीमोल झाले. त्याचबरोबर रस्त्यावर विक्री व्यवसाय करणारे, रोजंदारी मजूर, रिक्षाचालक यांची कुचंबणा झाली. त्यांना काही प्रमाणात शासकीय मदत रेशन आणि आर्थिक स्वरूपात आली. ज्यांनी उधारीवर माल विकला होता, असे व्यापारी अडचणीत आले; कारण काहीजण व्यवसाय सोडून परराज्यांत निघून गेले. तिथे उधारी बुडाली. अचानक आलेल्या दवाखान्याच्या बिलाची रक्कम बघून भलेभले घायकुतीला आले. उद्योग व्यवसाय बंद. कमाईच्या वाटा थांबलेल्या. भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नाही. दवाखान्याची बिलं डोंगराएवढी. लोकांनी पै पै करून साठवलेली जमापुंजी अवघ्या काही दिवसांत संपली. सुरुवातीला तर सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा पगारकपातीला सामोर जावे लागले; पण नंतर स्थिरस्थावर झाले. काही खासगी क्षेत्रातील लोकांना रोजगार गमवावा लागला. काहीजणांना पगार कपात झाली, तर काही ठिकाणी दिरंगाई होत होती. जितकी झळ शेतकरी आणि व्यावसायिक यांना बसली त्या तुलनेत नोकरदारांना त्रास कमी जाणवला. असंघटित आणि अकुशल कामगारांना चांगलाच फटका बसला.