शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात सैन्य भरतीच्या गर्दीत हुल्लडबाजांची चेंगराचेंगरी, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:30 IST

तयारी केलेल्या उमेदवारांवर अन्याय

कोल्हापूर : टीए बटालियनच्या सैन्य भरतीपूर्वी सायबर कॉलेजच्या पाठीमागील मैदानात हुल्लडबाजांनी केलेल्या चेंगराचेंगरीत दोन तरुण जखमी झाले. शुभम नामदेव पाटील (वय २३, रा. बेलवळे खुर्द, ता. कागल) आणि आदित्य दत्तात्रय तहसीलदार (२३, रा. तुरंबे, ता. राधानगरी) अशी जखमींची नावे आहेत. हा प्रकार रविवारी (दि. १६) सकाळी सहाच्या सुमारास घडला. हुल्लडबाजीमुळे भरतीसाठी पूर्वतयारी करून आलेल्या अनेक उमेदवारांना प्रक्रियेविनाच बाहेर पडावे लागले.टीए बटालियनच्या भरती प्रक्रियेसाठी शनिवारी रात्री कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह गुजरात आणि तेलंगणा येथील उमेदवारांना बोलवले होते. सायंकाळपासूनच हजारो उमेदवारांनी सायबर कॉलेजच्या मागील मैदानात गर्दी केली होती. पहाटे पाचपासून उमेदवारांचे जिल्हानिहाय गट तयार करण्याचे काम सुरू झाले. गुजरात आणि तेलंगणाच्या उमेदवारांना भरतीसाठी प्राधान्य देऊन शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर पाठवण्यात आले.त्यानंतर जिल्हानिहाय गट तयार करून अधिकारी भरतीबाबत सूचना देत असतानाच काही हुल्लडबाजांनी गोंधळ घातला. अचानक उडालेला गोंधळ आणि चेंगराचेंगरीत दोन उमेदवार जखमी झाले. जवानांनी हुल्लडबाजांवर सौम्य लाठीमार करताच अनेक उमेदवार मैदानाच्या भिंतीवरून उड्या टाकून बाहेर पडले. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.खुल्या भरतीमुळे स्थानिकांवर अन्याय?टीए बटालियनची खुली भरती असल्याने देशभरातील उमेदवार हजेरी लावत आहेत. त्या-त्या राज्यात भरती प्रक्रिया राबविणे सोयीचे असताना खुली भरती राबवून स्थानिक उमेदवारांवर अन्याय केला जात आहे, अशा भावना काही तरुणांनी व्यक्त केल्या. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन भरती प्रक्रियेत सुधारणा करावी, अशी मागणीही तरुणांनी केली.तयारीवर पाणी पडलेकागल तालुक्यातील एका अकॅडमीत गेल्या दोन वर्षांपासून तयारी करणारे २४ तरुण भरतीसाठी आले होते. हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने त्यांचा एक मित्र जखमी झाला. भरती प्रक्रियेऐवजी त्यांना मित्राला उपचारासाठी घेऊन जावे लागले. दोन वर्ष केलेल्या तयारीवर हुल्लडबाजांमुळे पाणी पडले, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : कोल्हापूर सैन्य भरती: गर्दीत चेंगराचेंगरीत दोन जखमी

Web Summary : कोल्हापुरात सैन्य भरतीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत दोन तरुण जखमी झाले. बेशिस्त वर्तनामुळे अनेक उमेदवार प्रक्रियेविनाच बाहेर पडले. खुल्या भरतीमुळे स्थानिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप, भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी.