शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरण आणि बोचणाऱ्या वाऱ्याने अंंगात हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 10:51 IST

ढगाळ वातावरण आणि अंगाला बोचणाऱ्या वाऱ्यामुळे दिवसभर अंगातून हुडहुडी जात नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, फेबु्रवारी महिना निम्म्यावर आला तरी अद्याप थंडी जाणवत आहे. उत्तर, पूर्व विभागात पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरण आणि बोचणाऱ्या वाऱ्याने अंंगात हुडहुडीयंदा हवामानाचा लहरीपणा जरा जास्तच

कोल्हापूर : ढगाळ वातावरण आणि अंगाला बोचणाऱ्या वाऱ्यामुळे दिवसभर अंगातून हुडहुडी जात नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, फेबु्रवारी महिना निम्म्यावर आला तरी अद्याप थंडी जाणवत आहे. उत्तर, पूर्व विभागात पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.यंदा हवामानाचा लहरीपणा जरा जास्तच पहावयास मिळत आहे. रेकॉर्ड ब्रेक पावसानंतर थंडीही तेवढीच असेल असे वाटत होते. मात्र, नोव्हेंबरअखेर परतीच्या पावसाने पाठ सोडली नाही. त्यानंतर काही दिवस थंडी जाणवली; मात्र त्यामध्ये तीव्रता नव्हती.

जानेवारी महिन्यातही थोडे दिवस ढगाळ वातावरण तर काही दिवस थंडी असेच राहिले. फेबु्रवारी उजाडल्याने उष्णता वाढू लागेल, असे वाटत असतानाच गेली दोन दिवस अचानक बदल झाला. रविवारी पहाटेपासून थंड वारे वाहू लागले. दिवसभर वाऱ्यांची झुळूक राहत असल्याने अंगातून थंडी जात नाही. त्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी अधिकच जाणवू लागली.

रविवारी कोल्हापूर जिल्ह्याचे किमान तापमान १७ डिग्रीपर्यंत आले होते; त्याचबरोबर ढगाचे आच्छादन दिवसभर राहिले. अधूनमधून सूर्यनारायणाचे दर्शन व्हायचे; मात्र पुन्हा ढगाळ वातावरण व्हायचे.

उत्तर व पूर्व भारतात सध्या पाऊस पडत आहे; त्याचा परिणाम हवामान बदलावर झाला आहे. उन्हाळ्या अगोदर थंड वारे वाहत असते; त्यामुळे आगामी तीन दिवस असेच ढगाळ वातावरणासह वारे वाहील, असा अंदाज आहे.

शनिवारनंतर कडक ऊनशुक्रवार (दि. १४) पर्यंत हवामान थंड राहणार आहे. मात्र, शनिवारनंतर तापमानात वाढ होणार आहे. ३६ डिग्रीपर्यंत तापमान जाणार असल्याने उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

वातावरणातील बदल ही उन्हाळ्याची चाहूल आहे. तीन-चार दिवस असेच हवामान राहण्याची शक्यता असून, हलका वळवाचा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- डॉ. जय सामंत, पर्यावरण शास्त्रज्ञ 

 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर