शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या मैदानातील लढाई निकराची होणार-- गारगोटी गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:51 IST

नेत्यांची प्रतिष्ठा पणालाशिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत गारगोटी गटाची निवडणूक विशेष लक्षणीय होणार आहे. दोन्हीही आघाडीचे प्रमुख विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या गावांचा समावेश असलेला हा गट निकराच्या ...

ठळक मुद्देचंद्रकांतदादा पाटील, प्रकाश आबिटकर, के. पी. पाटील, बजरंग देसाई यांच्या गावांचा समावेशभाजपचा बºयापैकी हा गट प्रभाव क्षेत्रात असल्याने भाजप हमखास एक जागा अथवा दोन जागा घेऊ शकते.जोरदार मोर्चेबांधणी करून चारीमुंड्या चीत करण्यासाठी अंतर्गत बांधणी

नेत्यांची प्रतिष्ठा पणालाशिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत गारगोटी गटाची निवडणूक विशेष लक्षणीय होणार आहे. दोन्हीही आघाडीचे प्रमुख विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या गावांचा समावेश असलेला हा गट निकराच्या लढाईचा गट म्हणून गाजणार आहे. या गटात सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, माजी आमदार के. पी. पाटील यांची मक्तेदारी आमदार आबिटकर मोडून काढणार? की के. पी. पाटील विजयाची हॅट्ट्रिक करणार? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

एकूण सहा गटांपैकी या गटातील निवडणूक ही निकालाच्या निकालाची ठरणार आहे. एकूण पाच जागांसाठी या गटातून निवडणूक होण्याची शक्यता आहे. कारखान्याला अध्यक्षपदी विराजमान करणाºया गटाची मुख्य भूमिका बजावणारा गट. याशिवाय सर्वांत जास्त निकराची आणि अटीतटीची निवडणूक दाखवून देणारा गट, अशा अनेक घटनांचा ऐतिहासिक साक्षीदार बनणारा हा गट आहे. गट नंबर पाच आणि उमेदवारांची संख्यादेखील पाच होण्याची शक्यता आहे.

या गटावर माजी आमदार के. पी. पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. गेल्या अनेक निवडणुकांत माजी आमदार गट विजयी होत आला आहे. मागील निवडणुकीत के. पी. पाटील यांच्या विरोधात माजी आमदार बजरंग देसाई आणि जि. प. माजी उपाध्यक्ष बाबूराव आण्णा देसाई यांच्यात लढत झाली होती. यात के. पी. पाटील यांनी तब्बल सहा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता, तर अनुसूचित जातीच्या गटातून सुनीलराव कांबळे यांनी बाजी मारली होती. पंडितराव केणे, सुनील कांबळे यांनी सलग दहा वर्षे संचालक म्हणून या गटाचे नेतृत्व केले आहे. गतविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाने राष्ट्रवादीला रामराम केल्याने दोलायमान स्थिती निर्माण झाली होती, परंतु कारखान्यावर के. पी. पाटील गटाने निविर्वाद सत्ता प्रस्थापित केली होती. हे संदर्भ पाहता आमदार के. पी. पाटील यांना शह देण्यासाठी तगडे उमेदवार उभे करणे आवश्यक झाले आहे.

यावेळी के. पी. पाटील यांची युती भाजपशी झाल्यामुळे माजी आमदार बजरंग देसाई आणि राहुल देसाई यांच्या गटाची अतिरिक्त ताकद मिळणार आहे. त्यामुळे या गटात स्वत: के. पी., शिवराज देसाई, मधुकर देसाई यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर आमदार आबिटकर गटातून बी. एस. देसाई, कल्याण निकम, दत्ताजीराव उगले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल. सयाजी देसाई अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांच्या गटाने आमदार प्रकाश आबिटकर गटाला बिनशर्त पाठिंबा दिल्याने काँग्रेसची काही मते विभागली जाणार आहेत. काही मते माजी आमदार बजरंग देसाई गटाला जातील. नेहमीप्रमाणे काँग्रेसचे मतदार विभागले जाण्याचा इतिहास कायम राहणार आहे.के. पी. पाटील गटातून अनेक इच्छुक आहेत. यामध्ये माजी संचालक व जिल्हा परिषदेचे सदस्य जीवनराव पाटील, पंडितराव केणे, विजय आबिटकर, शेखर देसाई, सुनील कांबळे, मधुकर जाधव, तर भाजपचे जयवंतराव चोरगे, विद्या नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, हिंदुराव पाटील, धोंडिराम मगदूम ही नेतेमंडळी इच्छुक आहेत. भाजपला सहा जागा देण्याच्या अटीमुळे इथे कदाचित एक जागा ते मागू शकतात. असे झाल्यास राष्ट्रवादीची एक जागा कमी होणार आहे. भाजपचा बºयापैकी हा गट प्रभाव क्षेत्रात असल्याने भाजप हमखास एक जागा अथवा दोन जागा घेऊ शकते. असे झाल्यास इच्छुक नाराजांची एक फळी निर्माण होणार असून त्यांची समजूत घालताना नेते मंडळींना नाकीनऊ येणार आहे. त्यामुळे जागा वाटपात बºयाच उलथापालथी होण्याचे संकेत आहेत, तर राष्ट्रवादीच्या अस्मितेसाठी लढलेल्या जि. प.च्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार विजय आबिटकर यांना संधी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या गटात बारा हजार आठशे चौºयान्नव मतदार संख्या आहे. गारगोटी, मडीलगे बुद्रुक, वाघापूर, गंगापूर, कूर, पुष्पनगर ही मोठी मतदारसंख्या असलेली गावे आहेत. या गावांतील उमेदवार नसणे हे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही. गारगोटी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वासाठी एक जागा गरजेची आहे. कारण गारगोटी येथील दोन्ही बलाढ्य गटांना शह देण्यासाठी कार्यकर्त्यांना जिवाचा आटापिटा करावा लागत आहे.के. पी. पाटील यांचे वर्चस्व असलेल्या या गटात आमदार प्रकाश आबिटकर शह देण्यासाठी तगडे उमेदवार आणि जोरदार मोर्चेबांधणी करून चारीमुंड्या चीत करण्यासाठी अंतर्गत बांधणी करीत आहेत. त्यांच्या व्यूहरचनेत सचिन घोरपडे व इतर काँग्रेस नेतेमंडळी मदत करीत आहेत. आमदार आबिटकर गटातून माजी सभापती नंदकुमार ढेंगे, वसंतराव प्रभावळे, माजी संचालक दिनकर कांबळे, अंकुश चव्हाण, बाजीराव चव्हाण, आर. जी. पाटील, विक्रम पाटील हे इच्छुक आहेत.

बजरंग देसाई गटाची या गटात निर्णायक ताकद असल्याने भाजपला हा गट अतिशय पूरक आहे. येथे दोन जागा घेतल्यास कारखान्याला प्रतिनिधी पाठविताना सुवर्णसंधी असलेला हा गट आहे. ते या संधीचा फायदा निश्चितच उठवतील.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार आबिटकर गटातून पराभव झालेले मधुकर देसाई हे आता के. पी. पाटील गटातून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही निवडणुकीदरम्यान कमी कालावधीत परस्परविरोधी गटातून निवडणूक लढवण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.अशा अनेक संदर्भाने हा गट विशेष महत्वाचा घटक ठरणांर आहे.गटात एकावन्न गावे : आकुर्डे, महालवाडी, म्हसवे, गिरगाव, हेदवडे, निळपण, दारवाड, पाचवडे, मिणचे खुर्द, भाटीवडे, नाधवडे, कूर, कोनवडे, मुदाळ, व्हनगुत्ती, वाघापूर, गंगापूर, पळशिवणे, मडीलगे बुद्रुक, मडीलगे खुर्द, कलनाकवाडी, आदमापूर, मोरेवाडी, बसरेवाडी, गारगोटी, सोनाळी, सालपेवाडी, फणसवाडी, पुष्पनगर, खानापूर, कोळवण, बारवे, मुरुक्टे, दिंडेवाडी, पांगिरे, नागणवाडी, मानवळे, पिंपळगाव, बेगवडे, टिक्केवाडी, आंबवणे, मिणचे बुद्रुक, लोटेवाडी, पंडिवरे, नांगरगाव, भेंडवडे, हेळेवाडी, आरळगुंडी, बामणे, बेडीव, शिंदेवाडी, पाल, पाळेवाडी, हणबरवाडी, नवरसवाडी.तेरा हजार मतदार  या गटात एकावन्न गावे असून, बारा हजार आठशे चौºयानव्व मतदार आहेत. के. पी. पाटील यांनी अनेक पंचवार्षिक निवडणुकीत या मतदारसंघाचे नेतृत्व केले आह,े तर पंधरा वर्षे अध्यक्षपदी विराजमान होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. कारखान्याला अध्यक्ष देण्याची परंपरा कायम ठेवली जाणार की खंडित होणार हे येत्या निवडणुकीत सिद्ध होईल.गत निवडणूक दृष्टिक्षेपउमेदवार आणि मिळालेली मतेके. पी. पाटील २२०५२, पंडितराव केणे १९८५६, बी. एस. देसाई १६०९५, बजरंग देसाई १५६०४, सुनील कांबळे संस्था गटचारशेपेक्षा जास्त मतदार संख्या असलेली गावे :आकुर्डे, म्हसवे, नाधवडे, कूर, मुदाळ, वाघापूर, गंगापूर, मडीलगे बुद्रुक, गारगोटी.