शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य, वाकरेत सलग २१ वर्षे अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 16:02 IST

होळी आणि पोळीचे अतूट नाते आहे; आपल्याकडे होळीला पोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. मात्र, होळीला पोळी अर्पण करण्याऐवजी गरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य दाखविण्याचा अभिनव उपक्रम वाकरे (ता. करवीर) येथे राबविण्यात आला. विशेष म्हणजे गेली २१ वर्षे हा उपक्रम राबविला जात असून, त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देगरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्यवाकरेत सलग २१ वर्षे अभिनव उपक्रम

कोल्हापूर : होळी आणि पोळीचे अतूट नाते आहे; आपल्याकडे होळीला पोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. मात्र, होळीला पोळी अर्पण करण्याऐवजी गरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य दाखविण्याचा अभिनव उपक्रम वाकरे (ता. करवीर) येथे राबविण्यात आला. विशेष म्हणजे गेली २१ वर्षे हा उपक्रम राबविला जात असून, त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.फार पूर्वीपासून वाकरेमध्ये ग्रामदैवत जोतिर्लिंग मंदिराच्या दारात सार्वजनिक होळी पेटवण्याची प्रथा आहे. त्यासाठी गावातून गोवऱ्या गोळा करून सायंकाळी मंदिरासमोर होळी केली जाते. होळीत ग्रामस्थ पुरणपोळ्या, भाताचा नैवेद्य व नारळ अर्पण करतात. होळीत टाकल्या जाणाऱ्या नैवेद्यांमुळे हजारो पोळ्या होळीत खराब होतात.

पोळीसह भाताची नासाडी होते. हाच नैवेद्य गोरगरीब व गरजूंना देण्यासाठी ग्रामस्थांचे परिवर्तन करण्याचा निर्णय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रा. एस. पी. चौगले यांनी वीस वर्षांपूर्वी घेतला. त्यानुसार आजपर्यंत हा उपक्रम सुरू आहे.यावेळी सरपंच वसंत तोडकर, प्रा. एस. पी. चौगले, पोलीसपाटील सुरेश पाटील, प्रा. एस. ए. पाटील, विजय पाटील, बळी पाटील, शिवाजी चौगले, नागेश शिंदे, बिजू कांबळे, महादेव पाटील, संदीप पाटील, रघू कांबळे, आनंदा गुरव, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Holiहोळीkolhapurकोल्हापूर