शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

होळी लहान पोळी दानला प्रतिसाद, विद्यार्थ्यांनी पोहचविल्या वीटभट्टीवर पोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 16:00 IST

आपल्यातील दुर्गुण, अनिष्ट प्रथा, रूढींना दहन करत सोमवारी कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली. होळी लहान..पोळी दान या उपक्रमाला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. 

ठळक मुद्देहोळी लहान पोळी दानला प्रतिसाद विद्यार्थ्यांनी पोहचविल्या वीटभट्टीवर पोळ्या

कोल्हापूर : आपल्यातील दुर्गुण, अनिष्ट प्रथा, रूढींना दहन करत सोमवारी कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली. होळी लहान..पोळी दान या उपक्रमाला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. पुरणाची पोळी होळीत जाळून टाकण्याऐवजी ती भूकेलेल्यांच्या पोटात घाला, या पुरोगामी कार्यकर्त्यांच्या हाकेला गेल्या काही वर्षांत चांगला प्रतिसाद लाभत आहे. नागरिक स्वत:हून पुढाकार घेऊन नैवेद्याची पोळी एकत्र करून सामाजिक संस्थांना देत आहेत. शिवाजी मराठा हायस्कूलच्यावतीने देखील पोळ्याचे संकलन करण्यात आले होते. या पोळ्या वीटभट्टीवर देण्यात आल्या.

शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पोळी होळीत न टाकता भुकेलेल्यांपर्यंत पोहोचविल्या. गेली दहा वर्षे हे विद्यार्थी हा उपक्रम करत आहेत. होळीनंतर पोळ्या होळी न टाकता त्या सुधाकर जोशीनगर, संभाजीनगर येथे आणून देण्याचे आवाहन या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यानुसार जमा झालेल्या पोळ्या या विद्यार्र्थ्यानी मंगळवारी सकाळी कोल्हापूर शहर परिसरातील वीटभट्ट्यांवर नेउन पोहचविले. गेली दहा वर्षे हा उपक्रम या शाळेतील विद्यार्थी राबवितात.हुताशनी पौर्णिमा यादिवशी दारात शेणी पेटवून होळी करण्याची परंपरा आहे. होलिका राक्षसिनीच्या पौराणिक कथेशी हा सण जोडला असला तरी आपल्यातील राग, लोभ, द्वेष, मत्सर यासोबतच समाजातील चुकीच्या रुढी परंपरांना जाळून टाका आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा, असा संदेश हा सण देतो. या दिवसापासून खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू होतो असं म्हणतात.

यानिमित्त सोमवारी रात्री अंबाबाई मंदिराच्या बाह्य आवारात पारंपरिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली. महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या हस्ते होलिका पूजन व प्रज्वलन झाले.सकाळपासून घरोघरी पुरणपोळीचा घमघमाट सुटला होता. दारात रंगांची सुरेख रांगोळी सजली. दारात एरंडेल झाडाची फांदी आणि शेणी रचण्यात आल्या. पुरणाची पोळी होळीत टाकण्याऐवजी त्याचा केवळ नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर होळी पेटवण्यात आली.

एकीकडे दारादारात तर दुसरीकडे गल्लोगल्ली स्थानिक मंडळांकडूनही होळी पेटवण्यात आली. पारंपरिक टिमक्या, नव्याने आलेले ढोल, ताशा वाजवत होळीभोवती फिरताना लहान मुले व पुरुष मंडळींनी फेऱ्या मारल्या. यानिमित्त शहरात सर्वत्र उत्साह होता. रात्रीच्या अंधारात पेटलेल्या होळ््या परिसर प्रकाशमान करीत होत्या. 

 

टॅग्स :Holiहोळीkolhapurकोल्हापूर