शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

नागरिक दुरुस्ती कायद्याविरोधी बिंदू चौकात धरणे, निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:30 AM

‘संविधान बचाव-देश बचाव, इन्कलाब झिंदाबाद’ अशा घोषणा देत ‘संविधान वाचवा, देश वाचवा कृती समिती’च्यावतीने सोमवारी सायंकाळी बिंदू चौकात धरणे आंदोलन करीत नागरिक दुरुस्ती विधेयकांविरोधी महिलांनी निदर्शने केली. आंदोलकांनी, ‘नो सीसीए, नो एनआरए, नो एनपीआर’ अशा काळ्या रंगातील पट्ट्या कपाळावर बांधून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देसंविधान वाचवा-देश वाचवा कृती समिती कपाळावर काळ्या पट्ट्या बांधून शासनाचा निषेध

कोल्हापूर : ‘संविधान बचाव-देश बचाव, इन्कलाब झिंदाबाद’ अशा घोषणा देत ‘संविधान वाचवा, देश वाचवा कृती समिती’च्यावतीने सोमवारी सायंकाळी बिंदू चौकात धरणे आंदोलन करीत नागरिक दुरुस्ती विधेयकांविरोधी महिलांनी निदर्शने केली. आंदोलकांनी, ‘नो सीसीए, नो एनआरए, नो एनपीआर’ अशा काळ्या रंगातील पट्ट्या कपाळावर बांधून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.नागरिक दुरुस्ती विधेयक कायद्याला विरोध करण्यासाठी, तसेच दिल्लीतील शाहीन बाग येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवारी सायंकाळी ऐतिहासिक बिंदू चौकात ‘संविधान वाचवा, देश वाचवा कृती समितीच्या’वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुस्लिम महिलांची संख्या लक्षणीय होती.नगरसेविका निलोफर आजरेकर, नगरसेविका वहिदा सौदागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. बिंदू चौकात धरणे आंदोलनात महिला आंदोलकांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायद्याला विरोध करणाऱ्या काळ्या रंगातील पट्ट्या कपाळावर बांधून निषेध नोंदविला. आंदोलकांनी इन्कलाब झिंदाबाद, संविधान वाचवा-देश वाचवा, वुई वाँट जस्टिस, संविधान विरोधी कायदे रद्द करा, अशी निदर्शने केली. या आंदोलनामुळे बिंदू चौक दुमदुमला.या आंदोलनस्थळी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी उपस्थिती दाखवून पाठिंबा व्यक्त केला. याशिवाय प्रतिमा सतेज पाटील, महिला फेडरेशनच्या डॉ. मेघा पानसरे यांच्यासह वंचित बहुजन विकास आघाडीच्या डॉ. अरुणा माळी, अ‍ॅड. उज्ज्वला कदम, डॉ. रुबिना महाबरी, आदींनी भाषणातून ‘एनसीआर’ला विरोध दर्शवित आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले. सायंकाळी उशिरा राष्ट्रगीताने धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली.या आंदोलनात, सोफिया म्हेत्तर, तबस्सुम मुल्ला, आसमा शेख, सीमा मोडक, किस्मत शेख, स्नेहल कांबळे, सुनीता पाटील, शुभांगी पाटील, अनिता जाधव, रूपाली कुराडे, सुनीता अमृतसागर, सुमन वाडेकर, संजीवनी चव्हाण यांच्यासह राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सहभागी झाल्या होत्या.विरोधाचे फलक झळकलेआंदोलनात लहान मुली, युवतींचाही मोठ्या संख्येने समावेश होता. मुलींसह महिलांच्या हातात ‘एनसीआर’ला विरोध करणारे फलक, तसेच भारताचा तिरंगा ध्वज झळकत होते.

 

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर