शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम रखडले

By भारत चव्हाण | Updated: January 14, 2025 18:56 IST

दुसऱ्या टप्प्यातील कामांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविले नाहीत

भारत चव्हाणकोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे कोल्हापुरात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉकी स्टेडियमचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. स्टेडियमचे अर्धेच काम पूर्ण झाले; पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामे पूर्ण करून घेण्यासह दुसऱ्या टप्प्यातील कामांचे प्रस्तावच केंद्र सरकारकडे पाठविले गेले नसल्याने काम पुढे सरकलेले नाही. ज्या संकल्पनेतून स्टेडियमची उभारणी केली जाणार आहे, ती पूर्णत्वास गेली तर याच स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी सामने होऊ शकणार आहेत.हॉकी स्टेडियमसाठी केंद्र सरकारच्या खेलाे इंडिया योजनेतून साडेपाच कोटी रुपये मंजूर झाले. त्यातून स्टेडियमचे सपाटीकरण, ॲस्ट्रो टर्फ, स्प्रिंकलर बसविण्यात आले आहे. पश्चिमेकडील गॅलरीचे काम लोकवर्गणीतून करून घेतले आहे. चार वर्षांत ॲस्ट्रो टर्फ बसविण्यापलीकडे एकही महत्त्वाचे काम झालेले नाही. ॲस्ट्रो टर्फ बसविल्यानंतर एप्रिल २०२४ पासून तर स्टेडियमकडे कोणीही अधिकारी फिरकलेही नाहीत. प्रलंबित कामांचा पाठपुरावा केलेला नाही.

ही कामे रखडली

  • स्टेडियमच्या शेजारी खेळाडूंना राहण्यासाठी वसतिगृह बांधावे लागणार आहे; पण त्याचा आराखडा तयार केलेला नाही.
  • रात्रीच्या वेळी होणाऱ्या सामन्यासाठी स्टेडियमवर फ्लड लाइट (प्रकाशझोत)ची सुविधा निर्माण करावी आहे. फ्लड लाइटचा प्रस्ताव तयार केलेला नाही.
  • स्टेडियमच्या पूर्व, दक्षिण तसेच उत्तर बाजूला गॅलरी बांधावी लागणार असून गॅलरी बांधकामाचे प्रस्ताव तयार केलेले नाहीत.
  • स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी चेंजिंग रूम, पंचांसाठी वेटिंग रूम, सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत.

स्टेडियमसाठी मान्यता, निधी मंजूरस्टेडियमला मान्यता मिळाली असून, निधीही मंजूर आहे. फक्त कामे पूर्ण करा आणि पुढील निधी घ्या, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. साडेपाच कोटींच्या निधीतील अद्यापही दीड कोटींचा निधी शिल्लक आहे, तो मागणीचा प्रस्तावही इकडून गेलेला नाही.

हॉकीचे मोठे शौकीन कोल्हापुरातआतापर्यंत कोल्हापूरच्या ३५० हून अधिक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. राज्यपातळीवर तर कोल्हापूरच्या मुलांनी विजेतेपद सोडलेले नाही. सध्या कोल्हापुरात मुलांचे २२, तर मुलींचे १७ संघ आहेत. तरीही हॉकीकडे अधिकारी, लोकप्रतिनिधी सापत्नभावाने का बघतात, याचे कोडे उमगलेले नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHockeyहॉकी