शिरोली : आशिया खंडात आपला राज्यविस्तार करणाऱ्या सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक आणि होळकर घराण्याने इतिहास घडवला आहे. देशभरातील २२ कोटी धनगर समाजाची ही प्रतीके आहेत. धनगर समाजाचा इतिहास सर्वज्ञात असून त्याचा प्रसार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र यशवंत सेना अध्यक्ष व उद्योजक राजेश तांबवे यांनी केले. ते शिरोली येथील बाळासाहेब ठाकरे सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाजाचे ज्येष्ठ धुळाप्पा पुजारी होते.
यावेळी तांबवे म्हणाले, वैभवशाली इतिहास असलेल्या धनगर समाजाला सध्या अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी तीव्र लढा उभारला आहे.
कार्यक्रमात सुभेदार छत्रपती मल्हारराव होळकर यांच्या ‘धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास’ या फोटो प्रतिमेचे वितरण करण्यात आले. यावेळी यशवंत सेना कायदा सल्लागार अध्यक्ष ॲ. विश्वजित गावडे, जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. संदीप हजारे, जिल्हा संघटक तमा शिरोळे, करवीर तालुकाप्रमुख अनिल बनकर, संजय सिद्ध, प्रमोद भानुसे, सुरेश शिद, संजय गावडे, रघुनाथ गावडे, शिवाजी गावडे, हरी पुजारी, दशरथ गावडे, नामदेव गावडे, मानसिंग गावडे, गुंडोपंत गावडे, म्हाळू गावडे, भगवान पुजारी, उमेश पुजारी, सचिन पुजारी उपस्थित होते.
फोटो ओळी
शिरोली येथील कार्यक्रमप्रसंगी बोलताना उद्योजक राजेश तांबवे, डॉ. संदीप हजारे, ॲ. विश्वजित गावडे, रघुनाथ गावडे व इतर.