शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचा शुभारंभ, जय भवानी...जय शिवाजी'चा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 16:20 IST

घनदाट धुके, थंडगार वारा व पावसाच्या सरी अशा निसर्गरम्य वातावरणात मोहिमेचा शुभारंभ

पन्हाळा : घनदाट धुके, थंडगार वारा व पावसाच्या सरी अशा निसर्गरम्य वातावरणात 'जय भवानी...जय शिवाजी...शिवाजी महाराज की जय, हर..हर..महादेव, नरवीर शिवाकाशीद व बाजीप्रभु देशपांडे की जय...या घोषणांनी संपुर्ण पन्हाळगड दणादणून गेला होता. हिलरायडर्स अँडव्हेंचर फौंडेशनची पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंतीचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. पन्हाळगडावर कोसळणाऱ्या या धो-धो पावसात देखील सकाळी पाच वाजल्या पासून या मोहिमेत सहभागी होणाऱ्या साहसवीरांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी मोहिमेस शुभेच्छा देताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहासाचा मोहिमेत सहभागी झालेल्यांना उजाळा मिळणारच आहे तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. प्लास्टिकचा वापर बंद करा निर्सगाशी एकरुप व्हा व निरोगी आयुष्य जगण्याचा साहसीविरांना संदेश दिला.दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार व प्रदुषण नियंत्रण विभागाचे प्रादेशिक संचालक जगन्नाथ साळोखे यांच्या हस्ते वीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन  करण्यात आला. यावेळी पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, हिलरायडर्स चे अध्यक्ष प्रमोद पाटील, प्रमोद माने, सागर बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.मोहिमेचे सलग ३८ वे वर्ष असुन ही ५८ वी मोहिम आहे. सकाळी ठिक साडेनऊ वाजता मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहीमेची माहिती फौंडेशनचे विनोद कांभोज यांनी दिली. त्यानंतर सुरज ढोली यांनी सर्व मोहिमेतील साहसवीरांना ध्येय मंत्राचे पठण केले. मोहिमेत महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा, गुजरात राज्यातील सहाशे साहसवीरांनी सहभाग नोंदवला. सकाळी ही मोहीम गडाच्या पश्चीमेस असलेल्या फुटका नंदी, पुसाटी बुरुज, तुरुकवाडी, म्हाळुंगे, मसाई पठार कडे रवाना झाली.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर