शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित कैद्यांचे पुनर्वसन करणार : सुरेंद्रनाथ पांडेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:44 IST

कळंबा कारागृहातील डॉक्टर, वकील, अभियंता अशा उच्चशिक्षित कैद्यांचे शैक्षणिक पात्रतेनुसार पुनर्वसन केले जाणार आहे. महिला कैद्यांना प्रशिक्षित करून त्यांचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती राज्याचे कारागृह व सुधार सेवा

ठळक मुद्देकळंबा कारागृहाच्या पाहणीप्रसंगी दिली माहितीकळंबा कारागृहात फाशी यार्ड उभारण्यासाठी शासनस्तरावर २०१७ मध्ये प्रस्ताव मागविला होता

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील डॉक्टर, वकील, अभियंता अशा उच्चशिक्षित कैद्यांचे शैक्षणिक पात्रतेनुसार पुनर्वसन केले जाणार आहे. महिला कैद्यांना प्रशिक्षित करून त्यांचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती राज्याचे कारागृह व सुधार सेवा विभागाचे पोलीस महासंचालक सुरेंद्रनाथ पांडेय यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी या कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कारागृह अधीक्षक शरद शेळके उपस्थित होते.

महाराष्टत एकूण ५२ कारागृहे आहेत. त्यांमध्ये सुरक्षित आणि उपक्रमशील म्हणून कळंबा कारागृहाचा दुसरा क्रमांक आहे. कारागृहामध्ये अकरा बरॅक आहेत. अंडा सेल स्वतंत्र आहे. या ठिकाणी बंदिस्त असलेल्या कैद्यांशी पांडेय यांनी संवाद साधला. अंबाबाई देवीचा लाडूप्रसाद बनविणाऱ्या बेकरी विभागास भेट दिली. येथे ५० महिला कैदी लाडूप्रसाद बनविण्याचे काम करतात. त्यांनी या महिलांच्या समस्या जाणून घेतला.

प्रत्येक महिलेस ४३ रुपये दिवसाला पगार दिला जातो. पगाराची रक्कम वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. कारागृह सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी काही कैद्यांनी शिक्षेत सूट मिळावी, खुल्या कारागृहात संधी द्यावी, सुट्या मिळाव्यात, अशा व्यथा पांडेय यांच्यासमोर मांडल्या. अधीक्षक शरद शेळके यांनी स्वागत केले.कारागृहात एटीएम सुविधाकारागृहात काम करणाºया प्रत्येक कैद्याचे पैसे त्याच्या बँक खात्यावर जमा करा. त्यांना हवे तेव्हा पैसे मिळण्यासाठी कारागृहात एटीएम सेंटर बसवा. त्यांचे पैसे घरी पाठविण्यासाठी आॅनलाईन सोय उपलब्ध करून देण्याच्या सूचना पांडेय यांनी अधीक्षक शेळके यांना दिल्या.फाशी यार्डच्या मंजुरीची मागणी कळंबा कारागृहात फाशी यार्ड उभारण्यासाठी शासनस्तरावर २०१७ मध्ये प्रस्ताव मागविला होता. गेले वर्षभर हा प्रश्न प्रलंबित आहे. त्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी कारागृह प्रशासनाच्या वतीने पांडेय यांच्याकडे करण्यात आली.कोल्हापुरातील कळंबा कारागृहाची पाहणी शनिवारी कारागृह व सुधार सेवा विभागाचे पोलीस महासंचालक सुरेंद्रनाथ पांडेय यांनी केली. यावेळी त्यांनी महिला कैद्यांशी संवाद साधला. दुसºया छायाचित्रात सुरेंद्रनाथ पांडेय यांचे कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी स्वागत केले.

टॅग्स :jailतुरुंगkolhapurकोल्हापूर