शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच निवडीला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 15:52 IST

sarpanch Court Kolhapur- राज्यातील सरपंच आरक्षणावरून चालू असलेल्या कायदेशीर लढाईत मंगळवारी उच्च न्यायालयाने २५ व २६ फेब्रुवारीला होणाऱ्या सरपंचांच्या निवडणुकांना हिरवा कंदील दाखविला. परंतु सरपंच निवडी मात्र याचिकेच्या अंतिम निर्णयास अधीन राहून असतील असा आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश शाहरुख काथावाला व विनय जोशी यांच्या खंडपीठाने दिला. याचिकेची सुनावणी १६ मार्चपर्यंत तहकूब केली.

ठळक मुद्देसरपंच निवडीला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदीलयाचिकेची सुनावणी १६ मार्चपर्यंत तहकूब

कोल्हापूर : राज्यातील सरपंच आरक्षणावरून चालू असलेल्या कायदेशीर लढाईत मंगळवारी उच्च न्यायालयाने २५ व २६ फेब्रुवारीला होणाऱ्या सरपंचांच्या निवडणुकांना हिरवा कंदील दाखविला. परंतु सरपंच निवडी मात्र याचिकेच्या अंतिम निर्णयास अधीन राहून असतील असा आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश शाहरुख काथावाला व विनय जोशी यांच्या खंडपीठाने दिला. याचिकेची सुनावणी १६ मार्चपर्यंत तहकूब केली.पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरटी, मजरेवाडी व करवीर तालुक्यातील कोगे, खुपिरे या ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या हरकती फेटाळल्याने त्यास ॲड. धैर्यशील सुतार व इतर वकिलांमार्फत दाखल केलेल्या याचिकेवर एकत्रित सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड धैर्यशील सुतार यांनी ह्या निवडणुका निवडणूक आयोग घेत नसून स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत घेतल्या जातात. त्यामुळे उच्च न्यायालयाला प्रकरणात हस्तक्षेप करण्यास घटनात्मक बाधा येत नाही.

सरपंच पदाचे आरक्षण हे नियमाला धरून झाले नाही. त्यामुळे समाजातल्या सर्वच घटकांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. राज्य शासनातर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी याचिका चालण्यास पात्र नसल्याचा आक्षेप घेतला. त्यावर न्यायालयाने सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास हरकत नसल्याचे सांगितले.

टॅग्स :sarpanchसरपंचkolhapurकोल्हापूरCourtन्यायालय