शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

"अहो कुठे आहात तुम्ही, अजित बोलतोय...", थेट तालमीतूनच उपमुख्यमंत्र्यांचा क्रीडा अधिकाऱ्यांना फोन!

By समीर देशपांडे | Updated: January 29, 2024 11:04 IST

अजित पवार हे शिस्त आणि वेळेचा काटेकोरपणा, यासाठी ओळखले जातात.

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर येथील प्रशासकीय आढावा बैठकीला खासदार आमदार आणि काही अधिकारीच उशिरा आल्याचे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान गंगावेस तालमीला भेट देण्यासाठी गेलेले अजित पवार यांनी क्रीडा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने तालमीत येण्यासाठी कडक भाषेत सुनावले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराराणी सभागृहात बैठक सुरु झाली आहे. दहा वाजता बैठक असताना पाच मिनिटे आधीच अजित पवार आल्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. पोलिसांनी यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली असून शासकीय ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही आत सोडण्यात येत नव्हते.         अजित पवार यांनी बैठक सुरू केल्यानंतर खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे या बैठकीसाठी हजर झाले. आज या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, जोतिबा विकास आराखडा यासह पंचगंगा प्रदूषण निर्मूलन आराखड्यावर अधिक  चर्चा होण्याची शक्यता असून कदाचित अजित पवार हे कोल्हापूरसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तत्पूर्वी पवार यांनी शासकीय विश्रामगृहावर प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. आज पवार यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा भरगच्च दौरा असून भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा कृषी प्रदर्शनाचा समारोप त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण असल्याचे दिसून येते.

गंगावेस तालमीचा घेतला आढावाउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालमींना मदत करण्याचे धोरण जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर तालमीचा आढावा घेण्यासाठी ते आज कोल्हापुरातील गंगावेस तालमीला भेट दिली. यादरम्यान अनुपस्थित असलेल्या क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून अजितदादांनी तातडीने त्यांना तालमीत येण्याची सूचना केली. यावेळी अजित पवार म्हणाले, "अहो कुठे आहात तुम्ही अजित बोलतोय, तुम्ही कुठे आहात आता? तालमीत कधी येणार आहे? लवकर शिस्तीत या...." दरम्यान,  अजित पवार हे शिस्त आणि वेळेचा काटेकोरपणा, यासाठी ओळखले जातात. नियम न पाळल्यामुळे अजित पवार यांनी बड्या-बड्या अधिकाऱ्यांना फटकारल्याचे किस्से यापूर्वीदेखील चर्चेत आले आहेत. याची प्रचिती पुन्हा एकदा कोल्हापुरात पाहायला मिळाली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर