शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

अरे हसनू... मंगळवार-बुधवार मी जाणार नाही बघ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:28 IST

‘अरे हसनू, तू मंगळवार व बुधवारी कागलात कधी नसतोस; त्यामुळे मी मरायचे ठरविले तरी कधी त्या दिवशी मरणार नाही...’ असे श्रीमती सकिनाबी मुश्रीफ आमदार हसन मुश्रीफ यांना कायम म्हणत असत.

ठळक मुद्देसकिनाबी मुश्रीफ यांचा शब्द खरा : आईच्या निधनानंतर गहिवरले हसन मुश्रीफकौटुंबिक, राजकीय जीवनातील आधार हरपला

कोल्हापूर : ‘अरे हसनू, तू मंगळवार व बुधवारी कागलात कधी नसतोस; त्यामुळे मी मरायचे ठरविले तरी कधी त्या दिवशी मरणार नाही...’ असे श्रीमती सकिनाबी मुश्रीफ आमदार हसन मुश्रीफ यांना कायम म्हणत असत. शुक्रवारी त्यांनी हा शब्द खरा करून दाखविला व हसन मुश्रीफ जवळ असतानाच, वयाच्या ९२ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

आईच्या निधनानंतर मुश्रीफ त्यांच्या आठवणींनी गहिवरून गेले. तसे मुश्रीफ हे कागलमधील सधन शेतकरी कुटुंब; पण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मुश्रीफ यांचे वडील हे मराठमोळे व्यक्तिमत्त्व. फेटा बांधलेला त्यांचा फोटो आजही त्यांच्या घरी पाहायला मिळाला. साऱ्या गल्लीचे ते ‘बापूजी’ होते. कागलचे ते पहिले उपनगराध्यक्ष.

सुमारे ५० वर्षांपूर्वी स्वत:ची मोटारकार दिमतीला बाळगणारे हे कुटुंब. हसन मुश्रीफ वीस-बावीस वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्याला आज ४६ वर्षे झाली; परंतु वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या आईने हसन, शमशुद्दीन व अन्वर हे भाऊ व तीन बहिणी यांचा सांभाळ केला, त्यांचे आयुष्य घडविले. त्या करारी बाण्याच्या होत्या. अखेरचा श्वास घेईपर्यंत त्यांना चांगली स्मृती होती. त्या आयुष्य अत्यंत शिस्तबद्धपणे जगल्या. मुश्रीफ सांगत होते की, त्यांनी कधीही औषधाची गोळी चुकविली नाही. एखादी गोळी डॉक्टरांच्या पुडीत जास्त आली तरी त्या ‘ही माझी गोळी नव्हे,’ म्हणून आठवण करून द्यायच्या.

गैबी चौकातील जुन्या घरात त्या राहत होत्या. मागील बाजूस हसन मुश्रीफ राहायचे. अनेक वर्षे ते मंत्री राहिल्याने मंगळवार-बुधवार ते हमखास मुंबईला असतात; त्यामुळे ‘तू नसताना मी कधी मरणार नाही बघ,’ असे त्या हसत-हसत म्हणायच्या. शुक्रवारी त्यांच्या मृत्यूनंतर ही आठवण सांगताना मुश्रीफ यांचेही डोळे भरून आले. जुन्या घरात जिथे त्यांची बेडरूम आहे, तेथूनच मुश्रीफ यांच्या बंगल्याकडे रस्ता जातो. त्यामुळे ज्या दिवशी मोटारसायकलींची वर्दळ कमी असेल, त्या दिवशी ‘आज हसनू घरात नाही,’ असा त्यांचा ठोकताळा असे. मुश्रीफ यांना राजकीय व कौटुंबिक जीवनातही आईचा खूप मोठा आधार होता. घरातून बाहेर पडल्यानंतर पाच मिनिटे आईजवळ बसल्याशिवाय गाडीत बसायचे नाही, हा शिरस्ता त्यांच्याकडून कधीच चुकला नाही. प्रत्येक निवडणुकीवेळी ते उमेदवारी अर्ज भरायला जाताना त्यांचा आशीर्वाद घेत. ‘तू निवडून येतोस’ असा त्यांचा आशीर्वाद असे. त्या प्रचारात किंवा राजकीय गोष्टींत फारशा नसायच्या; परंतु गल्लीतील सर्वांना घेऊन त्या मतदानाला मात्र आवर्जून जात असत. सत्ता, पद असेल-नसेल; परंतु तू लोकसेवेला कधी अंतर देऊ नको, असे त्यांचे सांगणे असे.आनंदाचा घडा रिता...तिन्ही भावांपैकी हसन मुश्रीफ यांचा स्वभाव, शारीरिक ठेवण सारे कसे आईसारखे. त्यामुळे ‘मी आईच्या वळणावर गेलोय,’ असे ते अभिमानाने सांगत. मुलाने वडिलांचे नाव केले, याचाही त्यांच्या आईला आनंद वाटे. त्या साºया आनंदाचा घडा आज रिता झाला... कायमचाच...!!

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफ