शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

'फादर्स डे'च्या शुभेच्छा अखेरच्या ठरल्या; तरुणीच्या आत्महत्येनं कुटुंबाला जबर धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:17 IST

वडीलांसह काकांना ‌फादर्स डेच्या शुभेच्छा देवून युवतीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. स्तुती नितीन काळे (वय १७, ए.पी.हायस्कूल, कनाननगर, नागाळापार्क) असे तिचे नाव आहे. मुलीच्या अशा अचानक जाण्याने तिच्या वडीलांना मानसिक धक्का बसला. परिसरही या घटनेमुळे हळहळला. याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली.

ठळक मुद्देतिच्या शुभेच्छा अखेरच्याच ठरल्या, अल्पवयीन मुलीची आत्महत्याराहत्या घरी घेतला गळफास : कनाननगर परिसरात हळहळ

कोल्हापूर : वडीलांसह काकांना ‌फादर्स डेच्या शुभेच्छा देवून युवतीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. स्तुती नितीन काळे (वय १७, ए.पी.हायस्कूल, कनाननगर, नागाळापार्क) असे तिचे नाव आहे. मुलीच्या अशा अचानक जाण्याने तिच्या वडीलांना मानसिक धक्का बसला. परिसरही या घटनेमुळे हळहळला. याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली.पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनूसार, एस्तेर पॅटन हायस्कूल कंपाऊड नागाळा पार्क येथे नितीन काळे यांचे कुटूंबिय राहते. त्यांच्या फर्निचर तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी परिचारीका आहे. मोठी मुलगी स्तुती ही बारावी विज्ञान शाखेत शिकते. रविवारी फादर्स डे होता. सकाळी तिने वडील नितीन काळे यांना समक्ष व काकांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आपल्या खोलीत गेलेली स्तुती दुपारी बारा वाजले तरी बाहेर आली नाही.

त्यामुळे नातेवाईकांनी तिच्या खोलीत जावून पाहीले असता तिने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तिला तातडीने बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या मागे आई, वडील, चुलते, बहीण, भाऊ असा परिवार आहे. तिच्या जाण्याने वडीलांसह सर्वच कुटूंिबयांना जबर धक्का बसला. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर